Home /News /viral /

बिबट्याने माकडिणीला जबड्यात पकडलं, तरी मृत आईला बिलगूनच राहिलं पिल्लू; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

बिबट्याने माकडिणीला जबड्यात पकडलं, तरी मृत आईला बिलगूनच राहिलं पिल्लू; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका माकडिणीची शिकार करून बिबट्या तिचा मृतदेह आपल्या जबड्यात पकडून नेत आहे. मात्र, माकडिणीचं पिल्लू तिच्या मृत शरीराला बिलगून बसल्याचं दिसतं.

  नवी दिल्ली 26 मे : सोशल मीडियावर प्राण्यांचे निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओमध्ये जंगली प्राण्यांमधील लढाई पाहायला मिळते, तर काही व्हिडिओमध्ये एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो. मात्र, सध्या जंगलाच्या दुनियेतील एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो हृदय पिळवटणारा आहे (Heart Breaking Video). हा व्हिडिओ पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये (Leopard Video) बिबट्याच्या जबड्यात एका माकडिणीचा मृतदेह दिसतो, तर तिचं पिल्लू आपल्या मृत आईच्या पोटाला बिलगून बसलेलं दिसतं. हा व्हिडिओ पाहून निसर्ग कधीकधी आपलं अगदी क्रूर रूप दाखवते, असं अनेकांनी म्हटलं आहे. अंडी चोरण्यासाठी आलेल्या तरुणीला मोराने आधी धक्का देऊन खाली पाडलं; मग केला हल्ला, Shocking Video व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका माकडिणीची शिकार करून बिबट्या तिचा मृतदेह आपल्या जबड्यात पकडून नेत आहे. मात्र, माकडिणीचं पिल्लू तिच्या मृत शरीराला बिलगून बसल्याचं दिसतं. हे दृश्य खरंच भावुक करणारं आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की माकडिणीची शिकार करताना कदाचित त्या बिबट्याची नजर आईला बिलगून बसलेल्या पिल्लाकडे गेली नाही. भीतीने आपल्या आईला बिलगून बसलेल्या या पिल्लाचा व्हिडिओ लोकांना भावुक करत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Earth Reels (@earth.reel)

  हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी याआधी कधीही असं दृश्य पाहिलं नाही. आपल्या मृत आईला बिलगून बसलेल्या या पिल्लाचं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं आहे. मात्र काही यूजर्सचं म्हणणं आहे, की जंगलाच्या दुनियेत जीवन आणि मरणाचा हा संघर्ष रोज सुरूच असतो. चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण साधं खरचटलंही नाही; दीड वर्षांच्या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर earth.reel नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, की निसर्ग कधीकधी इतका क्रूरही होऊ शकतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत आणि व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, जन्मापासून शेवटपर्यंत पिल्लाने आपल्या आईची साथ सोडली नाही. आणखी एकाने लिहिलं, हे दृश्य विचलित करणारं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Leopard, Shocking video viral

  पुढील बातम्या