बानगाव, 20 जुलै: एका शेळीनं 8 पाय आणि 2 कूल्हे (8 Legs and 2 hips) असणाऱ्या पिल्लाला जन्म (Baby goat) दिल्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचे फोटो सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Photo) होतं असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 16 जुलै रोजी सरस्वती मोंडल नावाच्या महिलेच्या शेळीनं या अद्भूत पिल्लाला जन्म दिला आहे. शेळीनं आठ पायाच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी गर्दी केली होती. सध्या या शेळीच्या पिल्लाचे फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत.
टाइम्स नाऊ न्युजनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथील आहे. बनगाव येथील रहिवासी असणाऱ्या सरस्वती मोंडल यांनी घरी काही गायी आणि शेळींचं पालन केलं आहे. दरम्यान 16 जुलै रोजी मोंडल यांच्या एका शेळीनं दोन पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक पिल्लू सामन्य होतं, तर दुसऱ्या पिल्लाला 8 पाय आणि दोन कूल्हे होते. आठ पाय आणि दोन कूल्हे असणाऱ्या या शेळीच्या पिल्लाला पाहून मोंडलही घाबरुन गेल्या होत्या.
हेही वाचा-VIDEO: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा अस्वलाचा महिलेवर हल्ला; पाहा कशी झाली अवस्था
दुर्दैव म्हणजे, जन्मानंतर काही मिनिटांतच संबंधित शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी मोंडल यांच्या शेळीनं आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली होती. त्यामुळे गावातील अनेक लोकांनी मोंडल यांच्या घरी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यातील काहींनी या शेळीच्या पिल्लाचे फोटो देखील काढले होते. सध्या हे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहेत.
हेही वाचा-बापरे! Hello Brother म्हणत चक्क वाघाशी मैत्री करायला गेला आणि...; पाहा VIDEO
सरस्वती मोंडल यांना याबाबत विचारलं असता त्यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, 'आठ पायांच्या पिल्लाला शेळीनं जन्म दिल्याची घटना मी पहिल्यांदाच पाहत आहे. याचं मलाही आश्चर्य वाटत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, आठ पायांच्या पिल्लाचा जन्मानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मृत्यू झाला आहे. पण शेळीचं दुसरं पिल्लू आणि शेळी दोघंही सुखरुप आहेत.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.