बिबट्याला चकवा देत पळालं पाडस; पण तितक्यात झाला खेळ खल्लास! पाहा थरारक VIDEO

बिबट्याला चकवा देत पळालं पाडस; पण तितक्यात झाला खेळ खल्लास! पाहा थरारक VIDEO

बिबट्या आणि पाडस यांच्यातील केविलवाणी लढत. अंगावर काटा आणणारा VIDEO

  • Share this:

लिम्पोपो (दक्षिण आफ्रिका), 07 डिसेंबर : जंगलात अगदी चपळपणे शिकार करणारा प्राणी म्हणजे बिबट्या. त्यामुळं बिबट्यापासून जंगलातील सर्व प्राणी दूर असतात. मात्र चक्क एक हरणाचं पाडस बिबट्याला जाऊन भिडलं मात्र त्याची लढाई काही सफल झाली नाही. दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बिबट्या आणि न्याळा (दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणारी एक हरिणासारखी प्रजाती) एकमेकांसमोर असल्याचे दिसत आहे. बिबट्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी पाडस त्याच्यावर डोक आदळत होतं, मात्र त्याला यश नव्हते. म्हणून त्यानं चपळतेने पळ काढण्याचाही प्रयत्न केला.

वाचा-चहलनं इन्स्टाग्रामवर टाकला फोटो अन् इंग्लंडची हॉट क्रिकेटपटू झाली ‘बोल्ड’!

बिबट्या आणि पाडस यांचा व्हिडीओ जंगलात पर्यटनासाठी आलेल्या आंद्रे फौरी यांनी शुट केला आहे. फौरी यांनी ‘लेटेस्ट साइट्स'ला, "पाडसाला तेथून पळून जाण्याची इच्छा होती, मात्र बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ते इतके वेगवान नव्हते. बिबट्या सतत त्याच्या मागे मागे फिरत राहिला. बिबट्यासाठी हे एकप्रकारचे मनोरंजन होते", असे सांगितले.

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाडसाला जेव्हा बिबट्याला हरवू शकत नाही हे समजले तेव्हा त्यांन बिबट्याला मारण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. फौरी यांनी, पाडसाला सुरुवातीला बिबट्यानं कोणतीही हानी पोहचवली नाही. 40 मिनिटे दोघांमध्ये हे युध्द चालू होते, मात्र शेवटी बिबट्याचा विजय झाला. हा व्हिडीओ खरतर अंगावर काटा आणणारा आहे.

वाचा-बँक ऑफिसर पतीने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; सापाचे दात रुतवून रचला बनाव

वाचा-खूशखबर! फक्त एका दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार पैसे, काय आहे EPFO प्लॅन?

दरम्यान हा व्हिडीओ काढणाऱ्या फौरी यांनी, “एक मार्गदर्शक म्हणून आम्ही नेहमीच शिकारी आणि शिकारीला बळी पडू नये म्हणून प्रयत्न करतो, परंतु माझ्यासोबत असणाऱ्यांसाठी हा खुपच रंजक अनुभव होता. पाडस जिंवत जरी असत तरी त्याला कोणीची आपल्यात घेतलं नसते, कारण बिबट्याला सारखा वास येईल”, असे सांगितले. दरम्यान हा व्हिड़ीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 7, 2019, 8:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading