Home /News /viral /

आश्चर्यकारक! शेपटीसह जन्मलं बाळ; भारतात झाली अतिशय दुर्मिळ प्रकरणाची नोंद

आश्चर्यकारक! शेपटीसह जन्मलं बाळ; भारतात झाली अतिशय दुर्मिळ प्रकरणाची नोंद

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

शस्त्रक्रिया करून मुलाची शेपटी काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. असं सांगितलं जात आहे की आतापर्यंत जगात अशा 195 केसेस झाल्या आहेत.

    नवी दिल्ली 14 जानेवारी : ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून एक अतिशय अजब प्रकरण (Weird Case) समोर आलं आहे. यात एक नवजात बाळ शेपटीसह जन्माला आलं. शस्त्रक्रिया करून मुलाची शेपटी काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. असं सांगितलं जात आहे की आतापर्यंत जगात अशा 195 केसेस झाल्या आहेत. मानवी शेपटी ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे. VIDEO: ओंजळीत पाणी घेऊन सापाला पाजलं अन्..; तरुणाचा प्रताप पाहून व्हाल शॉक डॉक्टरांचं म्हणणं आहे की, वक्षस्थळामधील हाडांच्या शेपटीची (Bony Human Tail in Thoracic Region) ही जगातील पहिली नोंद आहे. शस्त्रक्रिया करणारे प्रोफेसर डॉ अशोक कुमार महापात्रा यांनी सांगितलं की, भुवनेश्वरमधील एका खासगी रुग्णालयात ही 'शेपटी' काढण्यात आली. त्यांनी सांगितलं की नवजात बाळाच्या पाठीच्या कण्यामध्ये विसंगती होती आणि त्याच्या पाठीच्या वरच्या बाजूला शेपटी होती. पुरी जिल्ह्यातील सरकारी आरोग्य केंद्रात बाळाचा जन्म झाला. त्यानंतर बाळाला खासगी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. असं सांगितलं जात आहे की मानवी शेपटी ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे आणि आतापर्यंत अशी 195 प्रकरणे जगात नोंदवली गेली आहेत. परंतु वास्तविक हाड असलेली मानवी शेपटी फारच दुर्मिळ आहे आणि अशी २६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी मुलावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही दुर्मिळ घटना असून सर्वसामान्यांना ही बाब माहिती पाहिजे, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे. 8 KM खोल समुद्रात अडकलेली म्हैस; मच्छिमारांनी 7 तासाच्या प्रयत्नानंतर वाचवला जीव डॉ.महापात्रा यांनी ही शेपटी काढण्यासाठी न्यूरोसर्जन डॉ.रामचंद्र देव यांच्यासमवेत शस्त्रक्रिया केली. प्रो. महापात्रा यांनी सांगितलं की, बहुतेकदा नवजात शिशूंची गर्भाशयातच शेपटी वाढते, मात्र ती आठ आठवड्यांनी नाहीशी होते. परंतु काहीवेळा ही शेपटी नाहीशी होत नाही आणि शेपटीसोबतच बाळाचा जन्म होतो. सध्या शेपटी काढण्यात आलेल्या मुलाची प्रकृती ठीक आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Small baby, Viral news

    पुढील बातम्या