Home /News /viral /

बापरे! 'बाबुरावची चड्डी' एवढी महाग, किंमत ऐकून लोकही चक्रावली

बापरे! 'बाबुरावची चड्डी' एवढी महाग, किंमत ऐकून लोकही चक्रावली

सध्या इंटरनेटवर एका प्रकारच्या शॉर्ट्सची (Shorts) म्हणजेच चड्ड्यांची जोरदार चर्चा आहे. ही चड्डी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असून, तिची किंमत 15 हजार रुपये आहे.

    सध्याच्या काळात बहुतांश जण ऑनलाईन खरेदीवर (Online Shopping) भर देतात. एखादी वस्तू किंवा कपडे ऑनलाईन खरेदी करताना भरपूर व्हरायटी पाहता येते. तसंच ऑफर, सूटही मिळते. घरबसल्या शॉपिंगचा आनंद घेता येतो. एकीकडे ही स्थिती असताना, दुसरीकडे काही जणांना स्थानिक बाजारात (Local Market) जाऊन खरेदी करायला आवडतं. काही जणांना कपड्यांची (Cloths) खूप हौस असते. कपड्यांमध्ये गुंतवणूक करायला त्यांना खूप आवडतं. आपल्या आवडत्या कपड्यांसाठी असे लोक हवी ती किंमत मोजायला तयार असतात. सध्या इंटरनेटवर एका प्रकारच्या शॉर्ट्सची (Shorts) म्हणजेच चड्ड्यांची जोरदार चर्चा आहे. ही चड्डी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असून, तिची किंमत 15 हजार रुपये आहे. 15 हजारांची शॉर्ट्स पाहून नेटिझन्स (Netizens) आश्चर्य व्यक्त करीत आहेत; पण ही शॉर्ट्स साधीसुधी नाही. अत्यंत उपयुक्त आणि आरामदायी असलेल्या या शॉर्ट्सचं बॉलिवूडशी (Bollywood) खास कनेक्शन आहे. 'झी न्यूज हिंदी'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. `हेराफेरी` या गाजलेल्या हिंदी चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी खास भूमिका साकारली होती. परेश रावल यांनी साकारलेली बाबूराव (Baburao) ही भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात परेश रावल यांनी परिधान केलेली पट्ट्यांची चड्डी विनोदाचा विषय ठरली होती. सध्या या शॉर्ट्ससारखी दिसणारी अंडरगारमेंट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंडरगारमेंटची किंमत 15 हजार रुपये आहे. ट्विटरवर @vettichennaiguy नावाच्या अकाउंटवरून या शॉर्ट्सच्या विक्रीचा तपशील शेअर करण्यात आला आहे. यावर शेकडो जणांनी मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (नामांकित बिल्डरला धमकी, मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत? छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला बेड्या) बहुतांश जण लूज अंडरगारमेंट स्थानिक बाजारातून खरेदी करतात. स्थानिक बाजारात 200 रुपयांपर्यंत सैल शॉर्ट्स सहज मिळते. परंतु, ब्रँडचा (Brand) विचार केला तर अशा शॉर्ट्ससाठी एक हजार रुपयांच्या दरम्यान खर्च करण्यास तयारी असते. हेराफेरी चित्रपटातल्या बाबूरावच्या चड्डीसारखी शॉर्ट्स ऑनलाइन वेबसाईटवर 15 हजार रुपयांपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. ही किंमत ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. रिबॉक, प्युमा किंवा आदिदाससारखे ब्रॅंड्स 1500 रुपयांपासून शॉर्ट्सची विक्री करतात. पण या शॉर्ट्सची किंमत 15,000 रुपये आहे. ही किंमत पाहून नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही किंमत पाहून नेटिझन्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. कमेंटमध्ये एक युजर लिहितो, "बाबूरावनेदेखील एवढी महाग अंडरपँट परिधान केली नसेल." दुसरा एक युजर कमेंट (Comment) करताना लिहितो, "ही आहे का डिझायनर शॉर्ट्स? हृदयविकार असलेल्यांनी कृपया या शॉर्ट्सची किंमत वाचू नये." "या वेबसाईटवरून 15 हजार रुपयांची शॉर्ट्स खरेदी करणारे नेमके कोण आहेत", असा प्रश्न एक युझर कमेंट करताना विचारतो. एका युझरने अजब कमेंट नोंदवली. तो म्हणतो, "मी ही 200 रुपयांनाही विकत घेणार नाही. मी कपड्यांशिवाय झोपेन, पण ही कधीही विकत घेणार नाही.
    First published:

    पुढील बातम्या