बाप से बेटा सवाई...3 वर्षांचा लहानगा घेतोय वडिलांकडून संगीताचे धडे; VIDEO तुफान व्हायरल

बाप से बेटा सवाई...3 वर्षांचा लहानगा घेतोय वडिलांकडून संगीताचे धडे; VIDEO तुफान व्हायरल

हा छोटा उस्ताद 'नव नवल नयनोत्सवा..' या गीताचा रियाज करीत आहे, एकदा पाहाच त्याच्या हरकती..

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे अगदी खरं आहे. याचा प्रत्यत सध्या सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या एका व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या 3 वर्षांचा हा लहानगा आपल्या वडिलांकडून संगीताचे धडे घेत आहे. हा व्हिडीओ काही तासांत खूप व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करीत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर दिल्यानुसार या व्हिडीओमध्ये गायक, संगीतकार तानाजी जाधव आपल्या 3 वर्षांच्या मुलासोबत रियाज करीत आहेत. यावेळी ते मुलासोबत नव नवल नयनोत्सवा..हे नाट्यगीत गात आहे. विशेष म्हणजे हे इतकं अवघड गीत 3 वर्षांचा लहानगा अत्यंत सुरेल पद्धतीने गात आहे. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनीही हा व्हिडीओ शेअर करीत या बाळाचं कौतुक केलं आहे. लहानपणीच शास्त्रीय संगीताचे धडे घेणारा हा बाळ मोठा झाल्यावर मोठा गायक होईल अशी प्रतिक्रिया या पोस्टवर दिली जात आहे.

यूट्यूबवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून बाळ आपल्या वडिलांसोबत गाण्याचा सराव करीत आहेत

हे ही वाचा-VIDEO : रिपोर्टरने विचारलं, गावात 'विकास' पोहोचला? आजोबांनी दिलं मजेशीर उत्तर

हा बाळ वडिलांकडे पाहत त्यांच्यासारख गाण्याचा प्रयत्न करीत आहे. गीतातील लय, सुर, हरकतीही घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पाहुन अनेकांना बाळाचं खूप कौतुक वाटत आहे. शिवाय गीत गात असताना तो बाबांना मध्ये मध्ये सूचना ही करत आहे..बाबा स्लो म्हणा....बाबा मला म्हणू द्या...ते तीन वर्षाचं बाळ आपल्या बोबड्या आवाजात 'नव नवल नयनोत्सवा' हे गीत गात आहे. याचं सर्वांनीच खूप कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ काही तासातच खूप व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहे. संगीत व गीतकार तानाजी जाधव हे सुरजमधील असल्याचे त्यांच्या फेसबुकवरुन कळते. ते अनेक ठिकाणी संगीताचे कार्यक्रम घेतात याशिवाय अभंगवाणीसारखे कार्यक्रमही आयोजित करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: October 18, 2020, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading