मराठी बातम्या /बातम्या /Viral /भयंकर! फ्रँकीमध्ये खायला दिलं मेलेल्या उंदराचं पिल्लू; VIDEO VIRAL झाल्यानंतर प्रशासनाला जाग

भयंकर! फ्रँकीमध्ये खायला दिलं मेलेल्या उंदराचं पिल्लू; VIDEO VIRAL झाल्यानंतर प्रशासनाला जाग

या व्हिडीओमध्ये कुटुंबानी रेस्टॉरंटमध्ये खूप गोंधळ घातला. त्याशिवाय सोशल मीडियावर हा सर्व प्रकार व्यक्त केला

या व्हिडीओमध्ये कुटुंबानी रेस्टॉरंटमध्ये खूप गोंधळ घातला. त्याशिवाय सोशल मीडियावर हा सर्व प्रकार व्यक्त केला

या व्हिडीओमध्ये कुटुंबानी रेस्टॉरंटमध्ये खूप गोंधळ घातला. त्याशिवाय सोशल मीडियावर हा सर्व प्रकार व्यक्त केला

लाहोर, 11 जानेवारी : एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला जेव्हा त्यांनी खाण्याच्या ताटात मेलेला उंदीर पाहिला. आतापर्यंत आपण रेस्टॉरंटमध्ये झुरळ, मुंग्या अशी अनेक कीटक सापडल्याचे ऐकलं आहे. मात्र आता तर रेस्टॉरंटमध्ये या कुटुंबाला जेवणात उंदराचं लहान पिल्लू मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. एक लहान मुलगा हे खाणार तेवढ्यात त्याला हे उंदरातं लहानसं पिल्लू दिसलं. (A dead rat puppy fed in Frankie Wake up administration after VIDEO goes viral ) त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. सुदैवाने मुलाने हा प्रकार खाल्ला नाही.

ही घटना लाहोर शहरातील शवर्मा रेस्टॉरंटमधील आहे. उंदीर मिळाल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सालेह सलीम यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3000 हून अधिक शेअर करण्यात आला आहे.

सलीमने सांगितलं की, त्यांचा 10 वर्षांचा भाजा हा शवर्मा खाणार  होता, तेव्हा त्यात मेलेला उंदीर दिसला. त्यांनी सांगितलं की, रेस्टॉरंटमधील लोक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. ते पुढे म्हणाले की, लाहोर पोलिसांनी रेस्टॉरंट सील केलं आहे. (A dead rat puppy fed in Frankie Wake up administration after VIDEO goes viral ) या व्हायरल व्हिडीओमध्ये सालेहच्या आईने रेस्टॉरंटमधील वेटर खूप सुनावलं आहे.

उंदीर पाहून सालेहची आई खूप चिडली आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना खूप ऐकवलं. या व्हिडीओवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सालेहने आणखी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. ते म्हणाले की ही घटना 100 टक्के खरी आहे. हा व्हिडीओ सर्वांना पाहायला हवा. यावर तातडीने कारवाई करीत रेस्टॉरंट सील केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Pakistan, Viral video.