• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रिक्षाचालकाचा जबरदस्त स्टंट पाहून घालाल तोंडात बोटं: इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय हा VIDEO

रिक्षाचालकाचा जबरदस्त स्टंट पाहून घालाल तोंडात बोटं: इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय हा VIDEO

गिनीज बुकनं आपल्या पेजवरुन रिक्षाचालकाचा (Auto-rickshaw driver) जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो जुना आहे. मात्र, आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : आपल्या आसपास अनेक टॅलेंटेड लोक असतात. यातील काही लोक असं काही करून दाखवतात की सगळेच हैराण होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral Video on Social Media) चांगलाच चर्चेत आहे. हे स्टंट व्हिडिओ (Stunt Video) ज्या व्यक्ती केले आहेत, त्याच्या नावावर एक अतिशय मोठा रेकॉर्डही नोंदवला गेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्च्या (Guinness World Records) इन्स्टाग्राम पेजवरुन अनेकदा अशा व्यक्तींचे थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केले जातात, ज्यांची काहीतरी वेगळं करून दाखवत वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. सर्वांसमोरच वहिनीच्या मांडीवर येऊन बसला दीर अन् करू लागला ही मागणी; पाहा Video यावेळी गिनीज बुकनं आपल्या पेजवरुन रिक्षाचालकाचा (Auto-rickshaw driver) जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो जुना आहे. मात्र, आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात जगतीश मनी (Jagathish Mani) नावाचा एक व्यक्ती आपली रिक्षा केवळ दोन चाकांवरच 2.2 किलोमीटर अंतरापर्यंत चालवताना दिसतो.
  व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, की इपिक ऑटो रिक्षा साईड व्हिली. चेन्नईच्या जगतीश एम मनी यांनी हे अनोखं टॅलेंट दाखवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावी केला. व्हिडिओमध्ये तुम्ही जगतीशचे थक्क करणारे स्टंट पाहू शकता. हृदयद्रावक! 14 वर्षापूर्वी ज्याने वाचवलं त्याच्याच कुशीत गोरिलाने सोडले प्राण guinnessworldrecords या अधिकृत अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ जवळपास तीन मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये जगतीश मनी आपल्या पिवळ्या रंगाच्या रिक्षात बसलेले दिसतात, विशेष बाब म्हणजे ते ही रिक्षा तीन नाही तर केवळ दोनच चाकांवर आणि तेही वेगात चालवताना दिसतात. असे अनेक लोक आहेत, जे आपली रिक्षा दोन चाकांवर पळवतात. मात्र, विशेष बाब ही आहे, की हे लोक जास्त अंतरापर्यंत अशाच पद्धतीनं रिक्षा चालवू शकत नाहीत. मात्र, जगतीश मनी सुमारे २ किलोमीटरपर्यंत केवळ दोन चाकांवर आपली रिक्षा चालवतात. तेही अगदी वेगात. याच कारणामुळे त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना थक्क करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: