Home /News /viral /

रातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब

रातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब

एका रिक्षाचालकाला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे (Auto Driver Wins Rs 12 Crore Lottery). ही बातमी समजताच संपूर्ण कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला

    नवी दिल्ली 21 सप्टेंबर : अनेकदा असं म्हटलं जातं, की कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. अनेकदा लोक रातोरात करोडपती बनतात तर अनेकदा रातोरात रस्त्यावरही येतात. मात्र, केरळमधून आता एक वेगळीच घटना (Kerala Lottery) समोर आली आहे. यात आपलं नशीब अशा पद्धतीनं बदलेल अशी कल्पनाही या रिक्षाचालकानं केली नसेल. कोचीच्या जवळ असलेल्या मराडू येथे राहणाऱ्या एका रिक्षाचालकाला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे (Auto Driver Wins Rs 12 Crore Lottery). ही बातमी समजताच संपूर्ण कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हॉटेलमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेला स्टाफनं काढलं बाहेर; कारण ऐकून संतापले लोक मिळालेल्या माहितीनुसार, मराडू येथील रहिवासी असलेल्या या रिक्षा चालकाचं नाव जयपानल पी आर आहे. जयपालननं 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. जयपानल यांनी सांगितलं, की त्यांनी एक फॅन्सी लॉटरी विकत घेतली होती. मिळालेल्या वृत्तानुसार, ओणमच्या दुसऱ्या दिवशी या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला. विजयी तिकीटाचा नंबर टी 645465 होता. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालन यांनी सांगितलं, की त्यांनी 10 सप्टेंबरला त्रिपुनितुरा इथून हे लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. मात्र, नंतर त्यांना माहिती मिळाली की त्यांचा नंबरच फॅन्स नंबर आहे. 29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी केरळ राज्य लॉटरी संचालनालयाचं म्हणणं आहे, की या लॉटरीच्या निकालाची सोडत तिरुअनंतपुरममध्ये रविवारी झाली. राज्यभर विकल्या गेलेल्या 54 लाख लॉटरीच्या तिकिटांसाठी ओणम बंपर लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पण, जयपालनला पूर्ण 12 कोटी मिळणार नाहीत. या 12 कोटी रुपयांमधून कर भरल्यानंतर त्यांना फक्त 7 कोटी रुपये मिळू शकतील. मात्र, तरीही एवढी मोठी रक्कम मिळाल्यानं जयपाल आणि त्याचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. कारण, एक दिवस आपलं नशीब असं बदलेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Autorickshaw driver, Lottery

    पुढील बातम्या