• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • चक्क ऑटोची झाली आलिशान स्कॉर्पिओ कार; VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल

चक्क ऑटोची झाली आलिशान स्कॉर्पिओ कार; VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल

ऑटोची स्कॉर्पिओ कार बनवण्याचा देशी जुगाड.

 • Share this:
  मुंबई, 08 ऑक्टोबर : आपण मोठ्या, महागड्या, आलिशान कारमध्ये फिरावं असं प्रत्येकाला वाटतं. अशा गाड्या घेण्यासाठी पैसाही तितकाच लागतो. अनेकांच्या खिशाला या गाड्या परवडणाऱ्या नसतात. पण तरी अशा गाडीतून फिरण्याचं स्वप्न मात्र ते पाहत असतात. काही लोक तर फक्त स्वप्न पाहत बसत नाहीत, तर अशा गाडीतून फिरण्याचा आनंद मिळावा यासाठी काही ना काही तरी जुगाड (Desi Jugaad video) करतात. सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने चक्क ऑटोची (Auto) स्कॉर्पिओ कार (Scorpio car) बनवली आहे (Auto converted into Scorpio car). रस्त्यावर धावणाऱ्या या अनोख्या स्कॉर्पिओ कारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ही कार पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. देशी जुगाड करून ही कार तयार करण्यात आली आहे. ऑटोला असं मॉडिफाई करण्यात आलं आहे, ज्यामुळे ती अगदी हुबेहूब स्कॉर्पिओ कारसारखी दिसू लागली. या पठ्ठ्याच्या हुशारीला सर्वांनी दाद दिली आहे. त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. हे वाचा - डिझायनर कारची सवारी आणि पेट्रोलचीही गरज नाही, पठ्ठ्याने केला सॉलिड जुगाड; पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता, एक गाडी रस्त्यावर वेगाने धावते आहे. मागून पाहिलं तर स्कॉर्पिओ कारसारखीच दिसते. पण जसं तुम्ही या गाडीची पुढील बाजू पाहाल तर तुम्हाला जोर का झटका लागेल. कारण मागून स्कॉर्पिओ वाटणारी ही कार प्रत्यक्षात मात्र एक ऑटो आहे. ब्लॅक ऑटोचा लूक ब्लॅक स्कॉर्पिओत बदलण्यात आला आहे.
  कार्स फॉरएव्हर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा भन्नाट जुगाड सर्वांना आवडला आहे. खिशाला परडवत नसेल पण स्कॉर्पिओतून प्रवास करायचा असेल, तर या ऑटो कम स्कॉर्पिओतून प्रवास करायला हरकत नाही. हे वाचा - हजामत पाहूनच फुटला घाम; जीव मुठीत धरून सलूनमधून पळाला तरुण; VIDEO VIRAL याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात चक्क कारची अॅम्बॅसिडर कारची बैलगाडी करण्यात आली होती. महिंद्र कंपनीचे CEO आनंद महिंद्र यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला होता. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कारचा पुढचं बोनेट आणि भाग काढून तिथे बैल जुंपले आहेत. तर मागच्या भागावर टांग्यासारखी गाडी तशीच ठेवली आहे. 'मला वाटत नाही की नूतनीकरणक्षम उर्जेने चालणार्‍या या भारतीय कारशी एलोन मस्क आणि टेस्ला स्पर्धा करू शकतात.' असं कॅप्शन देऊन आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला होता.
  Published by:Priya Lad
  First published: