नवी दिल्ली, 21 जानेवारी : आपली स्मरणशक्ती अर्थात मेमरी चांगली
(Good Memory of Woman) असावी असं सर्वांनाच वाटतं. काही लोक मिनिटांत इथे-तिथे ठेवलेल्या वस्तू विसरतात. तर काही लोकांना पुढील अनेक दिवस महत्त्वाच्या वस्तू कुठे ठेवल्या याची आठवण राहते. चांगल्या मेमरीसाठी लोक बदाम खातात. किंवा मेमरी वाढवण्यासाठी अनेक जण गेमही खेळतात. पण एक अशी महिला आहे, जिची मेमरी कोणताही गेम न खेळता किंवा कोणताही पदार्थ न खाता अतिशय शार्प आहे. पण तिची ही शक्ती तिच्यासाठी शाप ठरत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.
ऑस्ट्रेलियात
(Australian Woman Remembers Everyday of life) राहणारी महिला रेबेका शारॉक (Rebecca Sharrock) 31 वर्षांची आहे. परंतु तिला 18 वर्षांपासूनच्या सर्व घटना लक्षात आहेत. तुम्ही म्हणाल, यात काय मोठी गोष्टी आहे. पण तुम्हाला हे आठवतेय का, की 19 व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तुम्ही काय केलं होतं? काय खाल्लं होतं? कुठे गेला होतात? काय कपडे घातले होते? इतकं सगळं लक्षात ठेवणं, लक्षात राहणं शक्य नाही. परंतु रेबेकाला हे सगळं लक्षात आहे.
महिलेला आहे विचित्र सिंड्रोम -
रेबेका एका विचित्र सिंड्रोम, हायपरथाइमेसियाने
(Hyperthymesia Syndrome) त्रस्त आहे. आयुष्यातील अतिशय लहान-लहान गोष्टी लक्षात ठेवण्याच्या सिंड्रोमला हायली सुपीरियर ऑटोबायोग्राफिकल मेमरी
(Highly Superior Autobiographical Memory) म्हणजेच हायपरथाइमेसिया असं म्हटलं गेलं आहे.
या सिंड्रोममध्ये लोकांना अगदी लहान-लहान गोष्टी अशा लक्षात राहतात, जशा त्या कालच घडल्या असतील. रेबेकालाही अगदी अशाच सर्व गोष्टी लक्षात आहेत. ती सहजपणे सांगू शकते, की 2007 मध्ये एखाद्या महिन्यात 15 तारखेला काय दिवस होता.
डेली मेलच्या 2017 च्या एका रिपोर्टनुसार, जगभरात या सिंड्रोमवाले केवळ 80 टक्के लोक आहे.
विसरण्याचा प्रयत्न करते महिला -
रेबेकाने तिला 2004 नंतरच्या सगळ्या गोष्टी लक्षात असल्याचं सांगितलं. अनेकांनी अशाप्रकारे गोष्टी लक्षात ठेवणं हे वरदान असल्याचं म्हटलं आहे. पण रेबेका मात्र याला एक शापच म्हणते. लोकांनी बोललेल्या काही गोष्टी, घटना तिला सतत लक्षात राहतात, ज्या तिला विसरायच्या असतात. अनेक गोष्टी तिला विसरायच्या असतात, पण ती विसरू शकत नाही
(Australian Woman Who Cannot Forget). तिला झोपण्यासाठी गोंधळ आणि चालू लाइट्स लागतात. कारण शांततेत तिला झोप येत नाही आणि जुन्या गोष्टी सतत डोक्यात घोळत राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.