Home /News /viral /

अशी माणसं आहेत कुठे? लोकांसाठी त्यानं सुरू केली मोफत कॉफी आणि बरंच काही!

अशी माणसं आहेत कुठे? लोकांसाठी त्यानं सुरू केली मोफत कॉफी आणि बरंच काही!

लोकांना आधार देण्यासाठी त्यानं दाखवली माणूसकी, काय केलं हे वाचून तुम्हीही कराल सलाम.

    सिडनी, 26 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटात लोकांना आधार आणि मन मोकळं करण्यासाठी एखादं ठिकाण किंवा मित्रांची गरज असते. त्यातच अनेकांची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर त्यांच्यावर आलेली संकटं दूर करणं यासाह सरकारला मदत करणं, असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तिनी मोफत कॉफी आणि सोबत गप्पाटप्पा अशी नवी संकल्पना सुरू केली. रिक एव्हरेट असं त्याचं नाव आहे. एव्हरेट आपल्या घराच्या खिडकीवर एक पाटी लिहिली आहे. त्यावर लिहिलंय, कोरोनापासून बचावासाठी मोफत कॉफी. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला होता. अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला तशीच रिकचीही नोकरी गेली. त्यामुळे भरपूर वेळ होता, आणि या वेळेचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी करण्याची गरज असल्याचे एव्हरेटला वाटले. पिझ्झा, चॉकलेट आणि कॉफी शॉपमध्ये काम केल्यामुळे त्याला पदार्थ बनवता येत होते. त्यामुळे त्यानी लोकांना मोफत कॉफी द्यायला सुरुवात केली आणि त्यासाठीच खिडकीवर बोर्ड लावला. वाचा-गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला करत होता प्रपोज, अचानक समोरून वेगानं आली सायकल आपण हा कुठलाही व्यवसाय करत नसल्याचं त्यानी आवर्जून नमूद केलं होतं. लोकांनी यावं गप्पा मारव्यात, मोकळं व्हावं हाच उद्देश ठेऊन आपली काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्यानी पूर्ण केली. कठीण काळात लोकांमधील संवाद वाढावा हे अत्यंत महत्त्वाचं असतं. वाचा-ऑस्ट्रेलियात प्रेम, उदयपूरमध्ये केलं प्रपोज! लग्नात आला असा ट्विस्ट लोकांनी यावं यासाठी त्यानी पाटीवर लिहिलं, 'मी काहीही विकत नाहीए, हे एक गिफ्ट तुमचं स्मितहास्यंच मला मोलाचं आहे. त्यानंतर रस्त्यावरून ये-जा करणारे अनोळखी त्याच्याशी बोलू लागले त्याला दुरून हॅलो म्हणू लागले. या वर्दळीमुळे अनेकजण त्याच्या या कॅफेवर यायला लागले आणि त्यांचा संवाद सुरू झाला. वाचा-अबब! नालेसफाई करताना सापडला भलामोठा उंदीर, VIDEO पाहून व्हाल हैराण कॉफीसोबत तो हॉट चॉकलेट, चहा, कॅपेचिनो द्यायला लागला. माझ्याशी संवाद साधून लोकांना आनंद मिळतो. हे खूप छान आहे. लोकांशी गप्पा मारताना मी सकारात्मक राहतो आणि त्यांनाही नकारात्मक बोलू देत नाही अशं रिट आवर्जून सांगतो. ही संकल्पना राबवणाऱ्या रिटने ऑस्ट्रेलियातील रोजगार गेलेल्यांना मदत करणाऱ्या सरकारी निधीला आपल्या बचतीतून आर्थिक मदतही केली आहे. मन मोकळं करण्यासाठी लोक येत रहावेत आणि त्याच्या हातून लोकांची सेवा घडावी अशीच रिटची इच्छा आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या