बापरे! चेहऱ्यावर शेव्हिंग क्रीमऐवजी त्याने लावलं हेयर रिमुव्हल क्रीम आणि मग...

बापरे! चेहऱ्यावर शेव्हिंग क्रीमऐवजी त्याने लावलं हेयर रिमुव्हल क्रीम आणि मग...

ऑस्ट्रेलियातील एका 22 वर्षांच्या तरुणानं चुकून त्याच्या चेहऱ्यावर शेव्हिंग क्रीमऐवजी (Shaving Cream) हेयर रिमुव्हल क्रीम (Hair Removal Cream) लावलं.

  • Share this:

सिडनी, 8 मे : ऑस्ट्रेलियातील एका 22 वर्षांच्या तरुणानं चुकून त्याच्या चेहऱ्यावर शेव्हिंग क्रीमऐवजी (Shaving Cream) हेयर रिमुव्हल क्रीम (Hair Removal Cream) लावलं. या चुकीचा चांगलाच परिणाम त्याला भोगावा लागला. हे क्रीम लावल्यानंतर त्याच्या चेहऱ्याची जळजळ होऊ लागली. चेहरा लालबुंद झाला,अर्ध्या भुवया (Eye Brows) गेल्या, तसंच डोक्यावरील काही केसही गळाले. रोनाल्ड वॉकर असं या तरुणाचं नाव असून, तो गोल्ड कोस्ट इथं राहतो. दाढी करताना शेव्हिंग क्रीम संपल्यानं त्याला तशीच दिसणारी दुसरी बाटली दिसली आणि त्याने त्यातलं क्रीम चेहऱ्यावर लावलं. मात्र रोनाल्डला त्वचेवर जळजळ जाणवू लागली तेव्हा त्याला जाणीव झाली की काहीतरी गडबड झाली आहे. त्यानं त्या क्रीमच्या बाटलीचे छायाचित्र काढून आपल्या भावाला पाठवलं. ते बघून त्याच्या भावानं त्याला सांगितले की, ते शेव्हिंग क्रीम नसून हेयर रिमुव्हिंग क्रीम आहे.

या अपघातामुळे रोनाल्डचे केस गळले असून, भुवयाही अर्ध्या गेल्या आहेत. रोनाल्डनं आपल्या मित्रांसाठी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्याला हा सगळा प्रकार विनोदी वाटत आहे. ‘आता दाढी (Beard) नाही; पण आता दोन भुवयांची मिळून एक भुवई आहे, असं त्यानं म्हटलं आहे. कामावर जावं लागलं तरी,  जोपर्यंत तो लक्ष देत नाही तोपर्यंत कोणीच्याही लक्षात ही गोष्ट येणार नाही, असा त्याचा विश्वास आहे.

लाडबीबलनं (LADBIBLE) शेअर केलेल्या फोटोपैकी एका फोटोत त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर हेअर रिमुव्हल क्रीम लावलेले आहे तर दुसऱ्या फोटोत भुवया अर्ध्या गेलेल्या दिसत आहेत. ‘माझ्या अर्ध्या भुवया कुठे गेल्या? हे मी काय केलं आहे?’ अशी पोस्ट या फोटोसोबत लिहिण्यात आली आहे.

दाढी नसतानाही रोनाल्ड शेव्हिंग क्रीम लावायला का गेला? असा प्रश्न अनेकांना पडला असून, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तरीही सोशल मीडियावरही पोस्ट शेअर केल्यापासून या पोस्टला 5 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रात्री त्यानं ही पोस्ट शेअर केली तेव्हा त्याला फक्त दहा लाईक्स मिळाल्या होत्या; पण दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत या पोस्टला जवळपास एक हजार लाईक्स मिळाल्या होत्या.

अशाच प्रकारचा एक अपघात मार्चमध्ये स्टॅफर्डशायर इथं घडला होता. अ‍ॅलेक्स होलिन्स नावाच्या 37 वर्षांच्या व्यक्तीला पाउंडलँडच्या रेझरमुळे जखम झाली आणि त्याने अर्धा तास रक्तस्त्राव झाल्याचा दावा केला होता.

First published: May 8, 2021, 11:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या