मराठी बातम्या /बातम्या /Viral /

70 किलोच्या केळीच्या घडामुळे मालकाचं मोठं नुकसान; कामगाराला द्यावी लागणार 4 कोटींची भरपाई

70 किलोच्या केळीच्या घडामुळे मालकाचं मोठं नुकसान; कामगाराला द्यावी लागणार 4 कोटींची भरपाई

एका कामगारानं आपल्या मालकाविरोधात 5 लाख डॉलरचा खटला दाखल केला आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण.

एका कामगारानं आपल्या मालकाविरोधात 5 लाख डॉलरचा खटला दाखल केला आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण.

एका कामगारानं आपल्या मालकाविरोधात 5 लाख डॉलरचा खटला दाखल केला आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण.

  • Published by:  Pooja Vichare
ऑस्ट्रेलिया, 09 ऑक्टोबर: एका कामगारानं आपल्या मालकाविरोधात 5 लाख डॉलरचा खटला दाखल केला आहे. हा खटला ऑस्ट्रेलियातील क्वींसलँडमधल्या (Queensland, Australia) एका शेतकऱ्यानं दाखल केल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये केळीच्या (banana fall) शेतात काम करणारा कामगार केळी उचलताना पडला आणि त्यात तो जखमी (injured) झाला. जखमी झाल्यानं कामगारानं त्याच्या मालकावर 5 लाख डॉलरचा खटला दाखल केला आहे. हेही वाचा- IPL 2021: इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन  द केर्न्स पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, कुकटाऊनजवळ एका शेतात एक झाड आणि त्याचे झाडाची केळी जॅम लॉन्गबॉटम नावाच्या व्यक्तीवर पडतात. हा व्यक्ती त्या शेतात कामगार म्हणून काम करत होता. जून 2016 मध्ये एल अॅड आर कॉलिन्सच्या शेतात केळ्याच्या कापणी दरम्यान तो जखमी झाला होता. या प्रकरणी आता कोर्टाचा निर्णय आला आहे. कामगाराने असा युक्तिवाद केला की कंपनीनं निष्काळजीपणा केला आहे. कारण त्यांना मोठ्या झाडांपासून मोठी केळी कशी गोळा करावी याचं पुरेसं प्रशिक्षण दिलं गेलेलं नव्हतं. या प्रकरणाबद्दल न्यायाधीश कॅथरीन होम्स कोर्टात म्हणाले की, "झाड असामान्यपणे उंच होतं. तसंच त्या झाडावरील केळी देखील बऱ्याच उंचावर होते. लॉंगबॉटमने त्याच्या उजव्या खांद्यावर घड आणि झाड धरलं होतं. त्यावेळी कामगार उजव्या बाजूला जमिनीवर पडला. या अपघातानंतर कामगाराला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर तो कामावर परतला नाही. कोर्टाच्या मते, केळीचे वजन सुमारे 70 किलो होतं. या अपघातानंतर त्याला मोठी दुखापत झाली. ज्यामुळे या व्यक्तीन तेव्हापासून काम केलं नव्हतं. कारण त्याला त्याच्या दुखापतीमुळे काम करण्यापासून रोखण्यात आलं. हेही वाचा- मुंबईकर महिलांनो!, आज लस घेण्यासाठी थेट जा लसीकरण केंद्रावर, नोंदणीची गरज नाही  न्यायमूर्ती होम्स यांच्या खंडपीठाखाली या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी कामगारानं केलेले दावे खरे असल्याचं आढळून आलं. त्यामुळे आता मालकाला जखमी झालेल्या कामगाराला नुकसान भरपाई म्हणून 502,740 डॉलर म्हणजेच 3 कोटी 77 लाख 15 हजार 630 रुपये द्यावे लागणार आहेत.
First published:

Tags: Australia, Viral

पुढील बातम्या