Home /News /viral /

मगर आणि स्पीड बोटीमध्ये लागली थक्क करणारी रेस, VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

मगर आणि स्पीड बोटीमध्ये लागली थक्क करणारी रेस, VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

समुद्रातील सरपटणारे प्राणी किती वेगवान असू शकतात हे व्हिडीओतून स्पष्ट होते.

    सिडनी, 14 सप्टेंबर : मगरीने स्पीड बोटसोबत केलेल्या रेसचा 13 सेंकदाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मगरीचे रौद्ररूप या व्हिडीओतून समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील अॅलेक डयुन याने हा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला असून तो त्याच्या मित्रांसोबत समुद्रात फिरत असताना त्याला हे दृश्य पाहायला मिळाले. त्यावेळी त्याने हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. समुद्रातील सरपटणारे प्राणी किती वेगवान असू शकतात हे व्हिडीओतून स्पष्ट होते. सध्या प्राण्यांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर नियमित व्हायरल होत असतात. त्यात अनेकवेळा प्राण्यांच्या क्यूट हालचाली व त्यांचे हावभाव हे प्रेक्षकांना हसवितात, लहानग्यांना आनंद देतात. मात्र, बऱ्याच वेळा प्राण्यांचे रौद्र रूपही कॅमेरात कैद झाले आहे. तशाच प्रकारचा हा एक व्हिडीओ फेसबुकवर गाजत आहे. या 13 सेकंदाच्या व्हिडीओत मगर आणि बोटीची शर्यत थक्क करणारी आहे. या व्हिडिओवर हजारो प्रतिक्रिया आल्या असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. वाचा-मास्क न घालता खेळायला गेली महिला, हंसानं घडवली चांगली अद्दल, पाहा VIDEO वाचा-VIDEO : समुद्रात बुडत होता 17 वर्षीय तरुण मात्र हुशारीने थोडक्यात बचावला या व्हिडीओत आपल्याला समुद्रातील मगर व स्पीड बोटची एक प्रकारे रेस लागल्याचेच दिसते. मगर बोटीच्या अगदी जवळ आहे, हे पाहून मगर पटकन पाण्याखालीही जाते व तात्काळ वर देखील येते. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ असून यामुळे समुद्रातील मनुष्याच्या वावरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका युझरने वर प्रतिक्रिया दिली आहे की, समुद्र हे त्या प्राण्यांचे घर आहे आणि आपण त्यात अतिक्रमण करू शकत नाही. त्यामुळे मी समुद्रात पोहायला जात नाही असे त्याने म्हटले आहे. तो मगरींचा प्रदेश असल्यानेच या मगरीने अशा प्रकारे पाठलाग केला. हे किती आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया आणखी एक युझरने दिली आहे. वाचा-कुत्र्यानं सोडवलं दोन मेंढ्यामधलं भांडण, पाहा VIDEO एका समुद्री मगराची लांबी 7 मिटरपर्यंत असू शकते़ तर त्यांचे वजन हे 100 किलो पर्यंत असू शकते. रात्रीच्या सुमारास हे जीव अधिक सक्षम होतात व शिकार करतात. जसे पाण्यात तसेच ते जमीनीवरही वावरतात. मगर हे अधिकांश उत्तर, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या उष्ण कट्टीबध्दीय प्रदेशात अधिक आढळतात.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या