मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का? आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO

पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का? आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO

एका लोकल फोटोग्राफरने पाकिस्तामधील चहावाल्याचा (Chaiwala from Pakistan) हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही काळातच तो व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा या चहावाल्याची चर्चा होते आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 08 ऑक्टोबर : 2016 साली एक चहावाला सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. एका रात्रीमध्ये तो इंटरनेट सेन्शेशन बनला होता. एका लोकल फोटोग्राफरने पाकिस्तामधील चहावाल्याचा (Chaiwala from Pakistan) हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही काळातच तो व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा या चहावाल्याची चर्चा होते आहे. 2016 मध्ये त्याची चर्चा त्याचे डोळे आणि त्याच्या लुकमुळे झाली होती. मात्र आता तो पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे, कारण त्याने आता स्वत:च्या मालकीचा कॅफे बनवला आहे.

अर्शद खान असं या व्हायरल झालेल्या चहावाल्याचं नाव आहे. त्याच्या निळ्या डोळ्यांनी त्यावर्षी अनेकांना फिदा केलं होतं. तो इस्लामाबाद 25 वर्षापासून राहतो आणि तिथे त्याची चहाची टपरी होती. जिया अली नावाच्या फोटोग्राफरने अर्शदचा तो फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील त्याची ही स्टोरी कव्हर केली होती.

View this post on Instagram

@arshadchaiwala.insta @kaximhasan

A post shared by Arshad Khan (@arshadchaiwala.insta) on

सोशल मीडियावर हिट झाल्यानंतर त्याला काही मॉडेलिंग ऑफर देखील मिळाल्या होत्या. चहावाला ते मॉडेल असा अर्शदचा प्रवास नक्कीच कमाल आहे. त्यानंतर आता त्याच्या यशामध्ये आणखी भर पडली आहे. अर्शदने स्वत:चा कॅफे सुरू केला आहे. डेलि पाकिस्तानने याबाबत वृत्त दिले आहे. 'Cafe Chaiwala Rooftop' नावाचा कॅफे अर्शदने सुरू केला आहे.

(हे वाचा-दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके! VIDEO तुफान व्हायरल)

त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, लोकांनी त्याला कॅफेचे नाव अर्शद खान कॅफे ठेवण्यास सुचवले पण 'चायवाला' या शब्दाने त्याला ओळख दिली. त्यामुळे तेच नाव त्याने कॅफेला दिले आहे. या कॅफेमधील त्याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

First published:

Tags: PHOTOS VIRAL