झूमवर LIVE सुरू होती संसदेची बैठक, कॅमेऱ्यात गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसले खासदार

झूमवर LIVE सुरू होती संसदेची बैठक, कॅमेऱ्यात गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसले खासदार

कॉंग्रेसच्या व्हर्च्युअल सत्रादरम्यान अर्जेंटिनामधील एका खासदाराला गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना पाहण्यात आले.

  • Share this:

बुएनोस आइरेस, 25 सप्टेंबर : कोरोनामुळे जगभरातील जवळजवळ सर्व ऑफिसं बंद आहेत. त्यामुळे सर्व कामं सध्या ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मीटिंग्ज सध्या झूमच्या माध्यमातून ऑनलाइन केली जात आहेत. अशा परिस्थितीत कॅमेऱ्यासमोर भयंकर प्रकार घडत आहेत. असाच प्रकार अर्जेटिनाच्या संसदेच्या बैठकीत घडला.

कॉंग्रेसच्या व्हर्च्युअल सत्रादरम्यान अर्जेंटिनामधील एका खासदाराला गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना पाहण्यात आले. कॅमेरा सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे खासदारांवर टीका केली जात आहे. एवढेच नव्हे तर या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

जुआन इमिलियो अमेरी हे अर्जेंटिनामधील सलताच्या उत्तर प्रांताचे प्रतिनिधित्व करतात, संसदेचे सत्र सुरू असताना जुआन आपल्या गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसले. मुख्य म्हणजे ही बैठक लाइव्ह सुरू होती. या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे तीव्र संताप व्यक्त झाला. यानंतर या खासदाराला निलंबित करण्यात आले.

वाचा-गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला करत होता प्रपोज, अचानक समोरून वेगानं आली सायकल

वाचा-शार्कच्या जबड्यात नवरा; वाचवण्यासाठी गरोदर पत्नीने मारली पाण्यात उडी आणि...

व्हायरल व्हिडीओमध्ये अमेरी यांच्या मांडीवर त्यांची गर्लफ्रेंड बसलेली दिसत आहे. त्यानंतर वेब कॅमेऱ्यावर दोघांचे अश्लील चाळे सुरू झाले. निलंबनानंतर अमेरी यांनी सांगितले की, ही महिला त्यांची गर्लफ्रेंड आहे. तसेच, मी मीटिंगमध्ये आहे, हे मला माहित नव्हते. दरम्यान ही पहिली वेळ नाही आहे, जेव्हा हा असा प्रकार घडला होता.

वाचा-ऑनलाइन बैठक टाळण्यासाठी महिला नेत्यानं लढवली शक्कल पण...काय घडलं पाहा VIDEO

एप्रिलमध्ये कॅलिफोर्नियाच्या एका अधिकाऱ्याने झूमच्या बैठकीत आपली मांजर फेकताना अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्याआधी झूमवर पालिकेच्या मीटिंगदरम्यान एक कपल सेक्स करताना दिसले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: September 25, 2020, 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading