Home /News /viral /

सर्वात छोटा गोल्ड स्मगलर! मुंग्यांनी चक्क चोरली सोन्याची चेन, VIDEO झाला व्हायरल

सर्वात छोटा गोल्ड स्मगलर! मुंग्यांनी चक्क चोरली सोन्याची चेन, VIDEO झाला व्हायरल

VIRAL VIDEO: खूप साऱ्या मुंग्या एका रांगेत सोन्याची चेन खेचून नेत आहेत. व्हिडिओ पाहून मुंग्या असंही काही करू शकतात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

    मुंबई, 25 मार्च : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओज व्हायरल होत असतात जे पाहून आपण एकदम थक्क होतो. पाहून आपला अगदी विश्वासच बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. (viral video) हा व्हिडिओ पाहून तो खरा आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या व्हिडिओत मुंग्या जे काम करत आहेत ते अतिशय अविश्वसनीय आहे. असं नेमकं करत तरी काय आहेत लहान मुंग्या? या मुंग्या चक्क एक सोन्याची चेन एका जागेवरून उचलून दुसरीकडे घेऊन जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. (ants carry gold chain video) व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, 'सर्वात छोटा गोल्ड स्मगलर' व्हिडिओमध्ये तुम्ही पावू शकता, की खूप साऱ्या मुंग्या एका रांगेत सोन्याची चेन खेचून नेत आहेत. व्हिडिओ पाहून मुंग्या असंही काही करू शकतात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. (video of ants carrying gold chain) हेही वाचा बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि... धडकी भरवणारा हा व्हिडिओ अनेकांना आवडतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सोशल मीडियावर 4 हजारपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं आहे. लोकांनी व्हिडिओवर अनेक गंमतीदार कमेंट्सही केल्या आहेत. (ips officer tweets ants video) हेही वाचा लय भारी! टिकटॉक....टिकटॉक... मॉडेल्सनाही मागे टाकेल असा कावळ्याचा कॅटवॉक एका युझरनं लिहिलं, आता यांच्यावर नेमकं कुठलं कलम लावलं जाईल? दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नसतो.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPS Officer, Twitter, Viral video.

    पुढील बातम्या