गर्दी पाहून चिडलेल्या वाघानं डरकाळी फोडत केला हल्ला, लोकांची अशी झाली अवस्था, पाहा VIDEO

गर्दी पाहून चिडलेल्या वाघानं डरकाळी फोडत केला हल्ला, लोकांची अशी झाली अवस्था, पाहा VIDEO

IFS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : अनेकदा जंगल सफारीदरम्यान वाघ दिसावा यासाठी लोक वेगवेगळे प्रकार करत असतात. नुकताच दोन दिवसांपूर्वी सिंहांना त्रास देत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा जंगल सफारीदरम्यान वाघाची वाट पाहात असलेल्या नागरिकांना सफारीवेळी आवाज करणं महागात पडलं आहे.

सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की चिडलेला वाघ सफारीतील पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी पुढे जातो. चिडलेला वाघ जोरात डरकाळी फोडून पर्यटकांच्या दिशेनं झेप घेत असताना पर्यटक तिथून पळून जातात. मजेशीर बाब म्हणजे पर्यटक या वाघाला हड..हड असं ओरडताना देखील दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.

IFS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी पर्यटकांनाच कळत नाही आपण कसं वागावं अशा स्वरुपाच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये पर्यटकांची चूक असल्याचं युझर्सनी म्हटलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 15, 2020, 9:02 AM IST

ताज्या बातम्या