मराठी बातम्या /बातम्या /Viral /हत्तीला आला राग म्हणून सोंडेनं उचलली सायकल; तरुणाचा थोडक्यात वाचला जीव, पाहा VIDEO

हत्तीला आला राग म्हणून सोंडेनं उचलली सायकल; तरुणाचा थोडक्यात वाचला जीव, पाहा VIDEO

 हा हत्ती ती सायकल घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

हा हत्ती ती सायकल घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

हा हत्ती ती सायकल घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

मुंबई, 07 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून अनेक हत्तीचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी खेळताना कधी रागात असलेला तर कधी जंगलातून फिरताना. नुकताच एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीच शांत आणि बुद्धीवान प्राणी म्हणून ओळखला जाणारा हट्टी मात्र या व्हिडीओमध्ये भयंकर चिडला आहे.

IFS अधिकारी दिग्विजय सिंह खाटी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देताना ते लिहितात की या तरुणानं चालाखीनं आपला जीव थोडक्यात वाचवला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 26 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून 1 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

हे वाचा-चीनला मोठा दणका, तैवाननं सुखोई-35 लढाऊ विमान पाडलं? VIDEO VIRAL

या हव्हिडीओमध्ये आपण पाहून शकता की तरुण सायकलसह जमिनीवर पडला आहे. हा हत्ती ती सायकल घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. हत्ती सायकल बाजूला करून तरुणाला सोंडेनं इकडे-तिकडे ढकलण्याचा प्रयत्न देखिल करतो. काही सेकंद श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या या व्हिडीओत हत्ती या तरुणाला चिरडतो की काय? असंही वाटतं मात्र तरुण आपला जीव मुठीत घेऊन मोठ्या युक्तीनं या संकटातून आपला जीव वाचवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओची खूप चर्चा देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

First published: