मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नाद नाही करायचा! चवताळलेल्या हत्तीनं केला टेम्पोचा चुराडा, पाहा VIDEO

नाद नाही करायचा! चवताळलेल्या हत्तीनं केला टेम्पोचा चुराडा, पाहा VIDEO

टेम्पो घेऊन जात असताना अचानक चवताळलेला हत्ती आला आणि....

टेम्पो घेऊन जात असताना अचानक चवताळलेला हत्ती आला आणि....

टेम्पो घेऊन जात असताना अचानक चवताळलेला हत्ती आला आणि....

  • Published by:  Kranti Kanetkar
बंगळुरू, 17 जानेवारी: कर्नाटकातील नागरहोल नेशनल पार्क इथे चवताळलेल्या हत्तीनं रस्त्यावर तुफान राडा घातला आहे. हत्तीच्या प्रतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिडलेल्या हत्तीनं रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोच्या बोनेटवरच धावत येऊन हल्ला केला आणि टेम्पोच्या बोनेटचा चुराडा केला. हत्ती पळत असल्याचं पाहून टेम्पो चालक घाबरला. त्याने टेम्पो मागे नेण्याचा प्रयत्न केला मात्र हत्तीने टेम्पोवर हल्ला चढवत तोडफोड केली. चिडलेल्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हत्तीनं कशा प्रकारे हल्ला केला ते पाहू शकता. ट्विटरवर 5 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ट्विटर यूजर माइकल ड्वायर यांनी 51 सेकंदाचा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर पोस्ट केला. यामध्ये हत्तीचा राग तुम्ही पाहू शकता. त्याने कशापद्धतीनं टेम्पोवर हल्ला केला ते या व्हिडिओमध्य़े दिसत आहे. आपल्या सोंडेनं हत्तीनं या टेम्पोचा बोनेट तोडला. माइकल ड्वायर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटरवर घडलेल्या घटनेचं कॅप्शन लिहून व्हिडिओ पोस्ट केला आहे. घटनेनंतर टेम्पोची काय अवस्था झाली आहे हे सांगण्यासाठी हा फोटो शेअर करण्यात आला आहे. चवताळलेल्या हत्तीनं आपल्या सोंडेनं टेम्पोचं मोठं नुकसान केलं आहे. हे अभयारण्य वाघ आणि हत्तींसाठी खास आरक्षित आहे. इथे विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात. हत्ती नेमका कशामुळे चवताळला काय झालं होतं याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकली नाही. वन अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे.
First published:

Tags: Karnataka, Viral video.

पुढील बातम्या