खोड काढणाऱ्या मुलाला हत्तीनं असा दाखवला इंगा, VIDEO VIRAL

खोड काढणाऱ्या मुलाला हत्तीनं असा दाखवला इंगा, VIDEO VIRAL

चक्क हत्तीने मुलाचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी: हत्ती हा तसा सहसा कुणालाही विनाकारण त्रास न देणारा प्राणी आहे. मात्र चक्क हत्तीने मुलाचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं काय घडलं की हत्तीनं मुलाचा पाठलाग केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्विस के ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओत निष्पाप प्राण्यांला मुलानं दिलेला त्रास दिसत आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. शांतपणे चालेल्या हत्तीला एक मुलानं मागूनं येऊन दोन वेळा ठोसा मारला आणि पळून गेला. हत्तीनं एकदा दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्यावेळी मात्र त्याचा पाठलाग केला. दोन वेळा मारल्यानंतर हत्तीचा मात्र पारा चढला आणि हल्ला करण्यासाठी मुलाच्या मागे पळाला.

'हत्तीवर प्रेम दाखवण्याऐवजी अशा प्रकारे त्याला त्रास देणं आणि हत्तीनं हल्ला करण्यासाठी केलेल्या पाठलागातून सुखरुप सुटका होणं हे भाग्यशाली आहे.' मात्र अशा पद्धतीनं मुक्या प्राण्यांना त्रास देणं गैर आहे असं आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करताना सुशांत नंदा यांनी कॅप्शन लिहिलं आहे. 27 जानेवारी रोजी शेअर केलेल्या ह्या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 1.7 हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर ट्विटरवर 694 कमेंट्स आल्या आहेत.

ह्या हत्तीला त्रास देणाऱ्या मुलाला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुक्या जीवांना त्रास देणाऱ्याला कठोर शिक्षा करण्याचा कायदा करावा अशीही मागणी प्राणी प्रेमींकडून होत आहे. हत्तीची स्मरणशक्ती चांगली असते त्यामुळे तो नक्की या मुलाला शोधून काढेल असंही एका युझरने म्हटलं आहे.

First published: January 29, 2020, 10:09 AM IST

ताज्या बातम्या