Home /News /viral /

VIDEO - चवताळलेल्या हत्तीपासून वाचवण्यासाठी पळाला पण पाय घसरला आणि...; शेवट पाहून भरेल धडकी

VIDEO - चवताळलेल्या हत्तीपासून वाचवण्यासाठी पळाला पण पाय घसरला आणि...; शेवट पाहून भरेल धडकी

रस्त्यावर गाडीतून उतरलेला माणूस दिसताच हत्तीने त्याचा पाठलाग केला. त्याला पळव पळव पळवलं आणि गाठलंच पण...

  मुंबई, 21 एप्रिल : हत्ती शरीराने अवाढव्य प्राणी असला तरी त्याची फार भीती वाटत नाही. कारण एरवी आपण त्याला कधी ना कधी पाहतो. तो शांत आणि सहसा माणसांना हानी न पोहोचवणारा असा प्राणी आहे, हे आपल्याला माहिती आहे. असं असलं तरी तो चवताळला तर मग त्याच्यासमोर कुणाचाच टिकाव लागत नाही. असाच एका संतप्त हत्तीच्या माणसावरील हल्ल्याचा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Elephant attack on man video). चवताळलेल्या हत्तीने एका व्यक्तीचा पाठलाग केला. हत्तीपासून वाचण्याच्या नादात ही व्यक्ती पळाली. हत्तीनेही त्या व्यक्तीला पळव पळव पळवलं. हत्तीपासून दूर पळताना या व्यक्तीचा तोल गेला आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. त्यानंतर हत्ती त्या व्यक्तीच्या जवळ आला. ही घटना फक्त वाचूनच तुमच्या अंगावर काटा आला ना? प्रत्यक्षात नेमकं यापुढे काय घडलं ते तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी पाहा. हे वाचा - तूने मारी एंट्री और...! नवरीबाई येताच सर्वांना भरली धडकी; कधीच पाहिली नसेल इतकी जबरदस्त Bridal Entry व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर काही गाड्या दिसत आहेत. काही गाड्या चालत आहे. तर काही रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. एका कारजवळ दोन व्यक्ती उभ्या दिसत आहेत. त्यापैकी एक व्यक्ती पाणी पिते आहे. तर एक व्यक्ती काही वेळाने गाडीच्या आत जाते.
  त्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या झाडांमधून एक हत्ती येताना दिसतो. हत्ती सुरुवातीला शांतपणे चालताना दिसतो. पण रस्त्यावर येताच तो चवताळतो. त्यानंतर एक व्यक्ती गाडीबाहेर रस्त्यावर दिसताच त्या व्यक्तीच्या मागे हा हत्ती धावतो. व्यक्ती आपला जीव मुठीत धरून पळतो. त्यानंतर एका गाडीच्या दिशेने धावतो. हत्तीही त्याचा पाठलाग करतो. हे वाचा - कित्येक जण शोधून शोधून थकले; पाहा तुम्हाला तरी सापडतो आहे का या आंब्यांमध्ये लपलेला पोपट काळ्या रंगाच्या गाडीजवळ ही व्यक्ती पोहोचते. गाडीतील असलेल्या व्यक्तीने गाडीचा दरवाजाही खुला ठेवला आहे, जेणेकरून ती व्यक्ती गाडीत येईल. व्यक्ती गाडीजवळ पोहोचते पण त्याचवेळी तिचा पाय घसरतो आणि ती जमिनीवर धाडकन कोसळते. त्यावेळी हत्तीही तिच्याजवळ पोहोचतो. त्यावेळी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो.  पण सुदैवाने ती व्यक्ती गाडीत जाते आणि हत्तीही शांत होऊन आपला मार्ग बदलतो.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या