Home /News /viral /

VIDEO - पळव पळव पळवलं आणि शेवटी...; चवताळलेल्या उंटाने मारकुट्या मालकाचा घेतला खतरनाक बदला

VIDEO - पळव पळव पळवलं आणि शेवटी...; चवताळलेल्या उंटाने मारकुट्या मालकाचा घेतला खतरनाक बदला

मारहाण करणाऱ्या आपल्या मालकाला उंटाने चांगलाच धडा शिकवला आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : उंट पाळीव प्राणी. तसा तो शांत म्हणजे माणसांवर हल्ला करताना दिसत नाही. पण जर कुणी त्याच्या वाकड्यात शिरलं तर तो सहनही करून घेत नाही. अशाच एका चवताळलेल्या उंटाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मारहाण करणाऱ्या आपल्या मालकाला उंटाने चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्याला केलेल्या मारहाणीचा त्याने खतरनाक बदला घेतला आहे (Camel attack on man video). चारा चरत असलेल्या या उंटावर त्याच्या मालकाने कारणाशिवाय मारहाण केली. त्यामुळे शांत असलेला उंट अचानक चवताळला आणि त्याने मालकावर हल्ला केला. उंटाने माणसावर केलेल्या हल्ल्याचं भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहून जसा अंगावर काटा येतो अगदी तसाच काटा उंटाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ पाहून येतो. हे वाचा - सोपी शिकार समजून उंदरावर हल्ला करायला गेला साप पण...; विश्वास बसणार नाही असा VIDEO व्हिडीओत पाहू शकता काही उंट चरताना दिसते आहे. एक व्यक्ती एका उंटाजवळ येते आणि त्या उंटाला मारायला जाते. कदाचित ही व्यक्ती या उंटाचा मालक असावी. सुरुवातीला उंट अगदी शांत दिसतो आहे. मालक जवळ आला तरी तो शांत उभा आहे. पण जेव्हा मालक त्याला मारायला हात वर करतो तेव्हा मात्र उंटाला राग अनावर होतो. तो चवताळतो आणि मालकावर हल्ला करतो. उंटाचं असं रूप पाहून मालकही घाबरतो. उंटापासून स्वतःला वाचवण्यासाठी तो जीव मुठीत धरून पळतो. उंटही त्याच्या मागेमागे धावतो. मालकाला उंट पळव पळव पळवतो. शेवटी त्याला जमिनीवर पाडतो. त्यावेळी भऱपूर धूळही उडालेली दिसते. त्या धुळीत फक्त उंटच दिसतो. त्याचा मालक गायबच झाला आहे. तो जमिनीवर तसाच पडला असावा. त्याला धडा शिकवल्यानंतर उंट कुठे थोडा शांत होतो. उंटाने व्यक्तीवर केलेला हल्ला पाहून तिथं असलेले इतर लोकही घाबरतात. ते त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून येतात. हे वाचा - VIDEO: घरटं बनवण्यासाठी जिवंत हरणाच्या शेपटीचे केस काढू लागला कावळा; पुढे काय घडलं एकदा बघाच @iftirass ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कोणत्याही कारणाशिवाय कुणाच्या वाकड्यात शिरू नये, नाहीतर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हाच धडा आपल्यालाही या व्हिडीओतून मिळतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या