मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरदेवाच्या हाताने रसगुल्ला खाण्यास नवरीचा नकार; पुढे नवरोबाने जे काही केलं ते पाहून खळखळून हसाल, VIDEO

नवरदेवाच्या हाताने रसगुल्ला खाण्यास नवरीचा नकार; पुढे नवरोबाने जे काही केलं ते पाहून खळखळून हसाल, VIDEO

नवरदेव अतिशय प्रेमाने नवरीला रसगुल्ला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी रसगुल्ला खाण्यास नकार देत विचित्र रिअॅक्शन देते.

नवरदेव अतिशय प्रेमाने नवरीला रसगुल्ला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी रसगुल्ला खाण्यास नकार देत विचित्र रिअॅक्शन देते.

नवरदेव अतिशय प्रेमाने नवरीला रसगुल्ला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी रसगुल्ला खाण्यास नकार देत विचित्र रिअॅक्शन देते.

  नवी दिल्ली 05 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील व्हिडिओ अनेकदा व्हायरल (Viral Wedding Videos) होत असतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांचीही भरपूर पसंती मिळते. यात कधीकधी नवरी आणि नवरदेव आपल्या धमाकेदार डान्सने (Dance of Bride and Groom) नेटकऱ्यांची मनं जिंकतात. तर अनेकदा वरातीतील पाहुणेही आपल्या अजब कृत्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. सध्या एका लग्नातील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. लग्नातील अनेक असे व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही पाहिले असतील ज्यात नवरी आणि नवरदेव नखरे करताना दिसतात. अनेकदा हे दृश्य पाहायला क्यूट वाटतं तर अनेकदा यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतं. सध्या अशाच एक नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरदेव अतिशय प्रेमाने नवरीला रसगुल्ला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी रसगुल्ला खाण्यास नकार देत विचित्र रिअॅक्शन देते. हे पाहून नवरदेव सुरुवातीला थोडा नाराज होतो मात्र नंतर तो असं काही करतो जे पाहून तिथे उपस्थित नातेवाईकही हैराण होतात. व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून असं वाटतं की लग्नातील कार्यक्रम सुरू आहेत आणि यानंतर नवरी आणि नवरदेव एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत. सर्वात आधी नवरीबाई नवरदेवाला रसगुल्ला खाऊ घालू लागते आणि नवरदेवही लगेच तो खातो. मात्र नंतर नवरदेव रसगुल्ला खाऊ घालू लागतो तेव्हा नवरी नकार देते आणि मागे सरकते. नवरीचे नखरे पाहून नवरदेव पुन्हा तिला रसगुल्ला खाण्यास आग्रह न करता स्वतःच रसगुल्ला आपल्या तोंडात टाकतो. हे पाहून आसपासचे सगळे पाहुणे हसू लागतात.
  View this post on Instagram

  A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

  सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या रागीट नवरीबाईचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नवरीचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या भरपूर पसंतीस उतरत आहे. अनेकजण या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. तर अनेकांचं असं म्हणणं आहे की नवरीने एवढे नखरे दाखवायला नको होते. काहींनी हा व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला की नवरीला हे लग्न मान्य नसावं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Wedding video

  पुढील बातम्या