मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नात नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरीबाई, भरमंडपातच केली धुलाई; VIDEO VIRAL

लग्नात नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरीबाई, भरमंडपातच केली धुलाई; VIDEO VIRAL

भरमंडपात नवरीबाईने नवरदेवाला जबरदस्त मारहाण केली आहे. लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीचा आखाडा बनला.

भरमंडपात नवरीबाईने नवरदेवाला जबरदस्त मारहाण केली आहे. लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीचा आखाडा बनला.

भरमंडपात नवरीबाईने नवरदेवाला जबरदस्त मारहाण केली आहे. लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीचा आखाडा बनला.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 09 ऑगस्ट : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात रोमँटिक, भावुक आणि मजेशीर क्षणही पाहायला मिळतात. पण सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. लग्नातच नवरीबाईने नवरदेवाला चोपून काढलं आहे. लग्न लागत असताना अचानक तिच्या रागाचा पारा चढला आणि ती नवरदेवाला चोप चोप चोपू लागली. लग्नात नवरीबाईने अचानक रौद्र रूप धारण केलं आणि लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीच्या आखाड्यात बदललं. नवरदेवाने असं काही केलं नवरीबाई भडकली. त्याचं कृत्य पाहून तिने त्याला पाहुण्यांसमोरच मारायला सुरुवात केली. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांच्यासमोर बसले आहेत. नवरदेव आपला हात उचलून नवरीच्या गालाला लावायला जातो. त्यानंतर नवरीबाईला राग येतो. ती आऊट ऑफ कंट्रोल होते. ती इतकी भडकते की नवरदेवाला मारायलाच लागते. सुरुवातीला त्याला हातांनी मारते. त्यानंतर मागचा पुढचा कोणताच विचार न करता ती त्याच्यावर अक्षरशः तुटून पडते. तिथं असलेल्या महिला तिला आवरण्याचा प्रयत्न करतात पण ती कुणालाच आवरत नाही. किती भयानक पद्धतीने ती नवरदेवाची धुलाई करते ते तुम्ही पाहूच शकता. हे वाचा - VIDEO - Paytm वरून भीक, कोट्यवधींची प्रॉपर्टी; आता हेलिकॉप्टरही खरेदी करणार भिकारी नवरीने नेमकी का मारहाण केली, याचं कारण काही यातून समजत नाही. नवरदेवाने गालाला स्पर्श केला म्हणून तिला राह आला की आधीपासूनच ती रागावलेली होती. याची माहिती नाही. पण व्हिडीओ पाहून जितका धक्का बसतो, तितकंच आपल्याला हसूही येतं.
kaunhainyehlog इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. लग्न होत आहे की लढाई, मंडपातच घटस्फोट झाला, जेव्हा बेस्ट फ्रेंड एकमेकांशी लग्न करतात. अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. हे वाचा - VIDEO - लग्नासाठी घेतली मोठी रिस्क! उतावळ्या नवरदेवाची वऱ्हाड्यांसह पुराच्या पाण्यात उडी तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय सुचतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

पुढील बातम्या