कॅलिफोर्निया, 30 जानेवारी : पत्रकारिता (Journalism) हे असं काम आहे, ज्यात नेहमी सजग, तप्तर राहावं लागतं. कुठे कधी एखादी घटना घडेल, कधीही कोणतीही बातमी येऊ शकते. पण लाईव्ह टीव्ही रिपोर्टींग (reporting) करणाऱ्या न्यूज अँकरसोबत एक अनोखा प्रकार घडला आहे. वेदर रिपोर्टींग करत असताना ABC7 या न्यूज चॅनेलच्या न्यूज अँकर लेस्ली लोपेज यांच्या 10 महिन्याच्या मुलाने त्यांना घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर (Twitter) खूप व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या (Covid19) संकटकाळात अनेकांना घरुन काम करावं लागत आहे. न्यूज अँकरिंग देखील घरून करता येत असल्याने ही महिला न्यूज अँकर घरूनच वेदर रिपोर्टींग (Weather Reporting) करत होती. त्याच्यवेळी तिचा लहानगाही त्या रिपोर्टिंगमध्ये आला. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर लाखो प्रतिक्रिया देखील येत आहेत. हा व्हिडीओ ABC 7 न्यूज चॅनेलच्या ब्रांडी हिट या न्यूज अँकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
'मम्मीच्या वेदर रिपोर्टींगदरम्यान चालू शकणाऱ्या नोलानला आता कुणीही थांबवू शकत नसल्याचं' कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये महिला न्यूज अँकरचा मुलगा मध्ये येऊन तिला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला उचलून घेते आणि तसंच रिपोर्टींग सुरू ठेवते.
या व्हिडीओला आतापर्यंत 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. याचबरोबर 2500 रिट्वीट्स आणि 28 हजार लाईक्स आहेत. अनेक जण प्रतिक्रिया देताना कोरोनाच्या या काळातील आई घरून काम करताना आणि त्यांची मुले मध्येमध्ये लुडबुड करतानाचे व्हिडीओ पाहणे माझे आवडते क्षण असल्याचं एकाने म्हटलं आहे. तर एकाने या कोरोनाने आपल्याला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्रित मॅनेज करायला शिकवलं असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री एलिझाबेथ बँक्स हिने देखील हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.
दरम्यान, अशा पद्धतीची घटना व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बीबीसीच्या (BBC) डॉ क्लेअर वेनहॅम आणि अँकर ख्रिश्चन फ्रेझर यांच्या मुलाखतीमध्ये डॉ. क्लेअर वेनहॅम यांच्या मुलीने मध्येच अडथळा निर्माण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.