आनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मनं; रिक्षा चालविणाऱ्या माजी राष्ट्रीय बॉक्सरला दिला मदतीचा हात

आनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मनं; रिक्षा चालविणाऱ्या माजी राष्ट्रीय बॉक्सरला दिला मदतीचा हात

आबिद एनआयएसमधून क्वालिफाइड कोचदेखील आहेत. मात्र त्यांना कुठेही नोकरी न मिळाल्याने ते रिक्षा चालवून आपलं कुटुंब चालवित आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे खूप चर्चा सुरू आहे. गरीबीचा सामना करणारे माजी नॅशनल बॉक्सर आबिद खान (National Boxer Abid Khan) यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आबिद एनआयएसमधून क्वालिफाइड कोचदेखील आहेत. मात्र त्यांना कुठेही नोकरी न मिळाल्याने ते रिक्षा चालवून आपलं कुटुंब चालवित आहेत.

Sports Gaon चे सौरभ दुग्गल यांनी आबिद यांच्यावर आलेल्या संकटाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. आनंद महिंद्रांनी हे रिट्विट करीत लिहिलं आहे की, धन्यवाद सौरभ. मला या गोष्टीचं खूप कौतुक आहे की, कठीण परिस्थिती असतानाही ते कोणत्याही मदतीची अपेक्षा करीत नाहीत. त्यामुळे मी लोकांना मदतीचं आवाहन करण्यापेक्षा त्यांची प्रतिभा आणि व्यासंग खूप मोलाचा आहे. मी त्यांचं स्टार्टअप बॉक्सिंग अकॅडमीमध्ये गुंतवणूक करू शकतो का आणि या माध्यमातून त्यांना मदत करू शकतो का, याबाबत मला सांगा.

काय करतात आबिद खान

व्हिडिओमध्ये आबिद खान म्हणतात की, गरीब किंवा मिडल क्लास व्यक्तीसाठी गरीबी हा सर्वात मोठा शाप आहे. आणि त्यापेक्षाही तो क्रीडा प्रेमी असेल तर परिस्थिती अधिक बिकट होते. यामध्ये वेळेच्या अपव्ययाशिवाय दुसरं काही नाही. स्पोर्ट्समॅन असताना मी खूप यश मिळवलं. डिप्लोमा केला मात्र त्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. सर्वत्र नकारचं मिळत होता. बॉक्सिंगमध्ये मिडल क्लास किंवा गरीब लोक येतात. कारण यात खूप धक्के खावे लागतात. पैसे वाले तर क्रिकेट, लॉन टेनिस, बँडमिंटन खेळतात.

हे ही वाचा-Video : Ambulance ला रस्ता देण्यासाठी नागरिक गाडीतून उतरले; होतंय कौतुक

आनंद महिंद्रा नेहमीच अशा प्रकारचे व्हिडिओ, फोटो शेअर करून समाजातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी केलेलं ट्विट वाचण्यासाठी युजर्स कायम उत्सुक असतात.

Published by: Meenal Gangurde
First published: April 18, 2021, 9:42 PM IST

ताज्या बातम्या