Home /News /viral /

आनंद महिंद्रा यांना सापडला खरा Iron man; VIDEO मध्ये मुलाचं टॅलेंट पाहून झाले इम्प्रेस

आनंद महिंद्रा यांना सापडला खरा Iron man; VIDEO मध्ये मुलाचं टॅलेंट पाहून झाले इम्प्रेस

या मुलाचं टॅलेंट पाहून त्याला मदत करण्याची इच्छा आनंद महिंद्रांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आपल्या सोशल मीडियावर (Social media) बरेच व्हिडीओ (Viral Video) पोस्ट करत असतात. त्यांनी शेअर केलेले हे व्हिडीओ काहीतरी शिकवणारे असतात किंवा प्रेरणा देणारे असतात. नुकताच त्यांनी एक असा व्हिडीओ शेअर केला जो पाहून ते स्वतः खूप इम्प्रेस झाले आहेत (Anand Mahindra tweet) . एका मुलाचं टॅलेंट त्यांनी सर्वांसमोर आणलं आहे. आपल्याला खरा रिअल मॅन सापडला हे त्यांनी दाखवून दिलं आहे (Anand Mahindra's viral video) . आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला त्यांनी खरा आयर्न मॅन म्हटलं आहे. त्याला मदत करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याला स्वतः प्रत्यक्षात भेटण्यासाठीही ते उत्सुक आहेत. त्याचं अनोखं टॅलेंट त्यांनी सर्वांसमोर आणलं आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ Brut. चा आहे. यामध्ये सांगितल्यानुसार मणिपूरच्या हिरोकमध्ये राहणाऱ्या प्रेम निनगोमबम (Prem Ningombam)  या मुलाने आयर्न मॅनचा सूट बनवला आहे. त्याने खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करून हा सूट तयार केला आहे. त्याने आयर्न मॅन फिल्म पाहिली त्यानंतर आयर्न मॅन सूट तयार करण्याचा विचार केला. 2015 साली त्याने असा सूट तयार करायचं ठरवलं.  व्हिडीओत प्रेम सांगतो की, मी जेव्हा मुव्ही पाहिली तेव्हा ती टेक्नॉलॉजी पाहून मी खूप हैराण झालो. हे वाचा - पोरं निघाली मुन्नाभाईपेक्षाही हुशार! परीक्षेतील कॉपीचा जुगाड पाहून शिक्षक हैराण व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार प्रेमला चित्रकलेची आवड आहे. आयर्न मॅनचा सूट तयार करण्यासाठी त्याने कोणतं विशेष प्रशिक्षण घेतलेलं नाही. हॉलिवूड फिल्म आणि इंटरनेटवरून त्याने माहिती मिळवली. पण त्याच्याकडे यासाठी पैसेही नव्हतं. त्याला कष्ट करून आपलं पोट भरणाऱ्या आईवर याचा भार टाकायचा नव्हता. पण त्याची आई नेहमी त्याच्या सोबत असायची. तुला जे करायचं आहे, ते कर मी तुला मदत करेन असं सांगायची. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढायचा.  यानंतर त्याने खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कार्डबोर्ड जमा केले आणि त्याने आयर्न मॅनच्या सूटवरील हेल्मेट बनवलं. हे वाचा - हा शक्तिमानच! लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का? आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे की, हा मुलगा टोनी स्टार्कच्याही पुढे निघून गेला. रिअल आयर्न मॅनसाठी मार्ग बनवायला हवा. याच्या आणि याच्या भावंडांच्या शिक्षणासाठी मला पुढाकार घ्यायचा आहे. कुणी मला याच्याशी संपर्क करवून दिला तर त्याला @KCMahindraEduc1 मार्फत मदत दिली जाईल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Anand mahindra, Viral, Viral videos

    पुढील बातम्या