विमानतळावर व्हीलचेअर हा भारतीयांचा एक 'जुगाड', आनंद महिंद्रांचे ट्विट VIRAL

विमानतळावर व्हीलचेअर हा भारतीयांचा एक 'जुगाड', आनंद महिंद्रांचे ट्विट VIRAL

विमानतळावर इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हीलचेअर कशासाठी मागवतात याचा अंदाज लावताना आनंद महिंद्रा यांनी तीन शक्यता व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावरून नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. अनेक प्रेरणादायी व्हिडिओ, फोटो ट्विटरवरून शेअर करतात. त्यांनी शनिवारी विमानतळावरील एक फोटो शेअर करताना तिथं वापरण्यात येणाऱ्या व्हीलचेअर हा एक जुगाड असल्याचं सांगत त्याची गरज वेगळ्याच कारणासाठी असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर संमिश्र प्रतिक्रिया आल्या.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये विमानतळावर अनेक कर्मचारी प्रवाशांसाठी ठेवण्यात आलेल्या व्हीलचेअरसोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी तीन पॉइंट दिले आहेत. महिंद्रा यांनी म्हटलं की, अनेक विमानतळावर भारतातून येणा जाणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर व्हीलचेअर मागवण्यात आल्या आहेत. आता मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की असं का झालं.

विमानतळावर इतक्या व्हीलचेअर मागवण्याचं कारण काय असावं याचा शोध घेताना आनंद महिंद्रा यांनी तीन शक्यता व्यक्त करताना तीन प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये 1. भारतातील वयोवृद्ध व्यक्ती इतर देशांच्या तुलनेत जास्त हवाई प्रवास करतात का? 2. आपल्याकडे कमजोर व्यक्ती आहेत का? 3. आपण फक्त जुगाडू आहे का ज्यामुळे व्हीलचेअर वापरून लाइनमध्ये उभा राहण्यापासून वाचतो आणि वेगाने बाहेर पडतो?

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात सर्वाधिक युजर्सनी महिंद्रा यांच्या तिसऱ्या पॉइंटवर सहमती दर्शवली आहे. अनेक युजर्सनी व्हीलचेअर्स हा भारतीयांनी केलेला घोटाळा म्हटलं आहे.

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

VIDEO : ब्रेन सर्जरीचं केलं फेसबुक लाइव्ह, पेशंट डॉक्टरांशी मारतेय गप्पा

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा Viral Video

VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 07:28 AM IST

ताज्या बातम्या