Home /News /viral /

‘कोरोना निर्बंध हटताच मी असा नाचेन’; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला Video पाहाच

‘कोरोना निर्बंध हटताच मी असा नाचेन’; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला Video पाहाच

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक श्वान (कुत्रा) त्याला शेल्टरमधून सोडल्यानंतर उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) तुफान व्हायरल झाला आहे.

    मुंबई 17 एप्रिल: संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून कोरोनासारख्या महामारीचा सामना करतंय. देशातही कोरोनाची दुसरी लाट आल्यानं परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. या लॉकडाऊन आणि निर्बंधांवर महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आणि ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. "कोरोनामुळेलावण्यात आलेले निर्बंध हटवल्यानंतर अशी असेल माझी प्रतिक्रिया",असं कॅप्शन देत महिंद्रांनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) तुफान व्हायरल झाला आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक श्वान (कुत्रा) त्याला शेल्टरमधून सोडल्यानंतर उड्या मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्येकुत्रा उडी मारण्यापूर्वी आजुबाजुच्यावातावरणाची तपासणी करताना दिसत आहे. अगदी तसंच कोरोनाचे निर्बंधसंपल्यानंतर मी करेन,असं महिंद्रा यांनी म्हटलंय. यावेळी एका युझरने म्हटलंय की,सर तुम्ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका,तर एकाने म्हटलं की काहीजण तरनिर्बंध असूनही अशाच उड्या मारताहेत. एक नेटकरी म्हणाला,की लॉकडाऊनचावैताग आला आहे. मी लॉकडाऊन संपल्यानंतर मनसोक्त नृत्य करेन. एकूणच आनंद महिंद्रांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. अवश्य पाहा - ‘मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भीक मागावी लागते’; प्रसाद ओक संतापला त्यांच्या या पोस्टला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेआहे. तरहा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जण म्हणताहेत,की केवळ आनंद महिंद्राच नाही तर आम्हीसुद्धा कोरोनासंपल्यानंतर असंच करू. आनंद महिंद्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत अनेकदा ट्विट करत असतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिल्लीचेमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत या विकेंडला रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळतासर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई असेल. दारूच्या दुकांनांसह सर्वच दुकानेआणि आस्थापना बंद ठेवण्यात येतील. दरम्यान, 30 एप्रिलपर्यंत राजधानीतीलमॉल्सबार,रेस्टॉरंट्सजिमस्पाउद्याने आणि सभागृह बंद राहणारअसल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचेरुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू करण्यात आलेअसून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महत्त्वाच्या कामाशिवाय लोकांनीघराबाहेर निघू नये,असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. तत्पूर्वी,नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA)इंटरनॅशन कमर्शिअल पॅसेंजरसर्व्हिसेसवरील बंदी 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.देशातही बऱ्याच विमानतळांवर जाताना कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल बाळगणे बंधनकारक आहे.
    First published:

    Tags: Anand mahindra, Dance video

    पुढील बातम्या