सुपरफास्ट बॉय! या मुलीचा वेग पाहून आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस! म्हणाले...

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ टाकल्यानंतर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत 1 लाख 16 हजारहुन अधिक लोकांनी पहिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ टाकल्यानंतर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत 1 लाख 16 हजारहुन अधिक लोकांनी पहिला आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर : देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra) नेहमीच सोशल मीडियावर(Social Media) ॲक्टिव्ह असतात. आपल्या फॉलोअर्सला ते नेहमीच प्रेरणा देत असतात आणि नवनवीन व्हिडीओ देखील आपल्या अकाऊंटवरून शेअर करत असतात. अनेक मजेशीर व्हिडीओ किंवा सामाजिक व्हिडीओ शेअर करून ते सामाजिक भान राखण्याचे देखील आवाहन करत असतात. त्यांचा दानशूरपणा देखील संपूर्ण देशाला माहित आहे. अनेकदा त्यांनी गरजूना व्यक्तींना मदत करून आपले सामाजिक कर्तव्य देखील पार पाडले आहे. त्यांच्या या दिलखुलास स्वभावामुळे ट्विटरवर(Twitter) त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी भारतात मोठी प्रतिभा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ही प्रतिभा जगासमोर येण्याची गरज असल्याचे देखील म्हटले आहे. आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी हा व्हिडीओ शेअर करत याला शोधावं अशी कुणाची इच्छा आहे का ? असेल तर तुमचे मोबाईल तयार ठेवा असं म्हटलं आहे. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा वेगाने धावताना दिसून येत असून त्यांनी याची तुलना रनमशीन(runmachine) बरोबर केली आहे. त्याचबरोबर हा मुलगा धावताना त्याचे पाय देखील दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधील या मुलाचे नाव रुडॉल्फ इंग्राम(rudolph ingram) असून तो अमेरिकेमधील सर्वात लहान खेळाडू आहे. त्याला जगातील सर्वात वेगवान मुलगा समजले जात असून त्याने अतिशय लहान वयात खूप यश मिळवले आहे. 2019 मध्ये एका शर्यतीत त्याने 60 मीटर अंतर अवघ्या 8.69 सेकंदांमध्ये पार केले होते. तर 100 मीटर अंतर 13.48 सेकंदामध्ये पार केले होते. मुख्य म्हणजे वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला असून तो यासाठी खूप मेहनत देखील घेत आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याचे वडील त्याला प्रेरित करत असून ते अमेरिकेचे माजी फुटबॉल खेळाडू आहेत. सध्या तो एनएफएल(NFL) मध्ये खेळत असून वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो मोठ्या संघाकडून खेळत आहे. त्याचबरोबर त्याने इतक्या लहान वयात उत्तम शरीरयष्टी देखील कमावली आहे. त्याच्या या वेगवान कामगिरीमुळे त्याला 'द ब्लेझ'(THE BLAZE) हे टोपणनाव देखील देण्यात आले आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ टाकल्यानंतर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत 1 लाख 16 हजारहुन अधिक लोकांनी पहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 6 हजारांहून अधिक लाईक्स आणि 600 हुन अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुलगा खूप वेगाने धावत असल्याचे म्हटले आहे. तो पळत असताना त्याचे पाय देखील दिसत नाहीत. जगातील सर्वात वेगाने धावणारा व्यक्ती बनण्याची क्षमता त्याच्यात आहे. आपल्या देशातील 120 कोटी नागरिकांमध्ये देखील अशी काही प्रतिभा आहे?याला सापडले जावे अशी कुणाची इच्छा आहे का ? असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकीही केली होती शेअर - आनंद महिंद्रा विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीचा देखील व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी बिहारमधील(bihar) एका घरावरील स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीचा व्हिडीओ शेअर करत आता यालाच मी एक राइज स्टोरी म्हणतो. स्कॉर्पिओ राइजिंग टू द रूफटॉप. त्यांच्या पहिल्या कार प्रेमाला माझा सलाम असं म्हटले होतं. बिहारमधील एका व्यक्तीने पहिल्यांदा स्कॉर्पिओ विकत घेतली आणि त्या गाडीच्या प्रेमापोटी आपल्या घरावर चक्क या आकाराची पाण्याची टाकी तयार करून घेतली होती. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात या गाडीची क्रेझ आहे. अनेक राजकीय नेत्यांकडे ही गाडी असून मजबूत असल्यामुळे या गाडीला मोठी मागणी आहे. बिहारमध्ये खराब रस्त्यांमुळे आणि सुविधा कॅमिओ असल्यामुळे या गाडीला मोठी मागणी असते.
    First published: