मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'अभी तो मैं जवान हूँ', फक्त म्हणू नका सिद्ध करून दाखवा; आनंद महिंद्रांनीसुद्धा दिली वयाची ही भन्नाट टेस्ट

'अभी तो मैं जवान हूँ', फक्त म्हणू नका सिद्ध करून दाखवा; आनंद महिंद्रांनीसुद्धा दिली वयाची ही भन्नाट टेस्ट

उद्योगपती आनंद महिंद्रा या अनोख्या टेस्टमुळे खूपच इम्प्रेस झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी इतरांसाठीसुद्धा ही टेस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा या अनोख्या टेस्टमुळे खूपच इम्प्रेस झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी इतरांसाठीसुद्धा ही टेस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा या अनोख्या टेस्टमुळे खूपच इम्प्रेस झाले आहेत आणि त्यामुळे त्यांनी इतरांसाठीसुद्धा ही टेस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 ऑक्टोबर : बुद्धिमता चाचणी असेल, जनरल नॉलेज असेल किंवा आयक्यू टेस्ट असेल, अशा एक ना दोन तुम्ही बऱ्याच परीक्षा किंवा टेस्ट दिल्या असाल. पण तुम्ही कधी वयाची टेस्ट दिली आहे का? आपण नेहमी तरुण राहावं असं अनेकांना वाटतं. त्यामुळे वय वाढलं तरी अभी तो मैं जवान हूँ असे म्हणणारे कित्येक लोक आहे. पण आता तुम्ही खरंच तरुण आहात हे फक्तू बोलून नाही तर सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर वयाच्या भन्नाट अशा टेस्टची एक पोस्ट केली आहे.

आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ही टेस्ट दिली आहे. या टेस्टमुळे ते खूपच इम्प्रेस झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी इतरांसाठीसुद्धा ही टेस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही टेस्ट खूप जबरदस्त पद्धतीने बनवण्यात आली आहे, हे मानावं लागेल. एका मित्राने मला ट्राय करायला सांगितलं आणि त्याच्या परिणामाबाबत मुळीच शंका नाही, असं त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पोस्ट केलेली ही वयाची टेस्ट तुफान व्हायरल होते आहे.

हे वाचा - Optical Illusion : तुम्हाला या फोटोत आधी काय दिसलं? उत्तरावरून 10 सेकंदात समजेल तुमचं व्यक्तिमत्व

हावर्ड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॅट्रीने ही टेस्ट तयार केली आहे. 50 पेक्षा जास्त वयाचे लोक ही टेस्ट पास करू शकले नाहीत, असा दावा युनिव्हर्सिटीने केला आहे.  आनंद महिंद्रा यांनी ही टेस्ट आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताच अनेकांनी ही टेस्ट दिली. काहींनी आपण ही टेस्ट पास केल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी आपण वयस्कर झाल्याचं कबूल केलं आहे.

ही मेंटल एज टेस्ट आहे. ज्यात काही वाक्यांमध्ये तुम्हाला तुमच्या मेंदूचं वय समजेल. माणसांच्या मानसिक वयाची माहिती मिळते. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता 12 वाक्ये दिसत आहेत. आता या वाक्यांवरून तुम्हाला तुमच्या मेंदूचं वय कसं समजेल, असा प्रश्न तुम्हाला पडले आणि टेस्ट नेमकी कशी द्यायची. तर तुम्हाला ही वाक्ये एकदाच, न चुकता वाचायची आहेत.

टेस्टचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे टेस्टच्या शेवटी तुम्हाला प्रत्येक वाक्याचा तिसरा शब्द वाचायला सांगण्यात आलं आहे. ज्यातून 'ही एका वयस्कर व्यक्तीला 40 सेकंद व्यस्त करण्याची कला आहे', असं वाक्य तयार होतं. हाच तर टेस्टमधील खरा ट्विस्ट आहे.

हे वाचा - stupid question : 'भैया भाजी कशी दिली?'' तुम्ही देखील असे विचित्र प्रश्न विचारता का?

आता हे वाक्य वाचल्यानंतर तुम्ही या टेस्टमध्ये पास ही फेल हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Viral, Viral news