VIDEO : अशा देशप्रेमाला सलाम! दोन्ही पाय नसताना खांबावर चढून केलं ध्वजवंदन

VIDEO : अशा देशप्रेमाला सलाम! दोन्ही पाय नसताना खांबावर चढून केलं ध्वजवंदन

हा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गल्लो गल्ली ध्वजवंदन करत हा दिवस साजरा केला. देशाप्रती आपले असलेले प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी सर्वच आपल्या परीनं प्रयत्न करत असतात. मात्र कधी आपल्या व्यंगत्वावर मात करून देशप्रेम दाखवणाऱ्या एका अवलियाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी अशाच एका देशप्रेमाचे दर्शन घडवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

वाचा-फोटो खरा आहे बरं का! पाहा रात्रीच्या अंधारात कसा दिसतो भारत

या व्हिडीओमध्ये दोन्ही पाय नसेलला तरुण खांबावर चढत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात किंवा खांबावर कोणताही झेंडा नाही आहे. तर, या अवलियानं आपल्या शरीरावच तिरंग्याचे चित्र काढले आहे. या व्हिडीओमध्ये हा अवलिया हातावर चढून खांबाच्या टोकाला पोहोचतो.

वाचा-नशिबच फुटकं! ATM लुटतानाच लागली आग, धूम ठोकून पळाले चोरटे

वाचा-VIDEO : लोकलच्या लेडीज डब्ब्यात शिरला श्वान, सीटसोडून महिला पळाल्या

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, “हा व्हिडओ कालच पोस्ट केला असता, पण आज सकाळी मला तो मिळाला. आम्हाला प्रेरणा देणारी कोणतीही गोष्ट पाहण्यास उशीर झालेला नाही; असे काहीतरी जे आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटणे थांबवतात; एखादी मोठी गोष्ट आपल्याला स्मरण करून देते हेच कारण आपल्याला महान गोष्टी करण्यास सक्षम करते”, असे कॅप्शन लिहिले आहे.

First published: January 27, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या