Home /News /viral /

आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट VIDEO; हिंसाचार संपविण्यासाठी चांगला आहे पर्याय

आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट VIDEO; हिंसाचार संपविण्यासाठी चांगला आहे पर्याय

या व्हिडीओवर युजर्सही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत

    नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : आपण दररोज अनेक मारहाणीच्या बातम्या पाहतो..वाचतो. आपण याचा भाग नसलो तरी हिंसा होऊ नये यासाठी काहीतरी पर्याय शोधता येऊ शकतात. असाच एक पर्याय महिंद्रा समूहाचे (Mahindra Group) चेअरमॅन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सुचविला आहे. त्यांनी मारहाणीतील हिंसा टाळण्यासाठी डिजिटल पद्धत ट्विटरवर (Twitter) एक व्हिडीओ शेअर करीत सांगितली आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला दोघे जण व्हिडीओ कॉलवर (Video Call) बोलत असताना दिसत आहे. काही वेळानंतर ते अचानक एकमेकांवर ओरडू लागतात. त्यांचा राग इतका वाढतो की ते कॅमेऱ्यावर मारायला सुरुवात करतात. आनंद महिंद्रा लिहितात की, हे सज्जन अशा देशाचे दिसतायेत की जेथे चपल्लांनी केलेली मारहाण अधिक लाजिरवाणी आहे. नक्कीच हे वर्क फ्रॉम होम (Work From Home) करीत आहेत. ते पुढे म्हणतात की, खरं सांगू तर आता सर्व भांडणं, सर्व हल्ले, पुर्ण हिंसा स्क्रिनवरच व्हायला लागली तर...जग खूप सुरक्षित होईल. युजर्सही देत आहेत मजेशीर प्रतिक्रिया व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनेही मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देत आहेत. अनेक ट्विटर युजर्सने सवाल उपस्थित केला आहे की या दोघांच्या लॅपटॉपचा कॅमेरा कोणत्या धातूचा तयार केला आहे वा कोणत्या कंपनीचा आहे. इतकच नाही तर लोकांनी अशा प्रकारच्या भांडणाला नावही दिलं आहे. काही लोक अशा प्रकारच्या भांडणाला डिजिटल लफडा म्हणत आहेत. तर काही जण याला वर्च्युअल चप्पल फाइट म्हणत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Tech Mahindra, Viral video.

    पुढील बातम्या