Home /News /viral /

जगातला सर्वात उंच पोलीस गाडीत कसा बसणार? CEO ने व्यक्त केली काळजी, पाहा VIDEO

जगातला सर्वात उंच पोलीस गाडीत कसा बसणार? CEO ने व्यक्त केली काळजी, पाहा VIDEO

पंजाब पोलिसात असलेल्या जगदीप सिंग यांची उंची 7 फूट 5 इंच इतकी आहे. या उंचीमुळे ते लोकप्रिय असले तरी त्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

    अमृतसर, 11 मार्च : भारतीय लोकांची सरासरी उंची साडेपाच फूट इंच इतकी आहे. पण जगातील सर्वात उंच पोलिस भारतात असून त्याची उंची 7 फूट 6 इंच इतकी आहे. अमृतसरमध्ये राहणाऱ्या या पोलिसाचे नाव आहे जगदीप सिंग. या जगदीप सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर करत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी एक खास बोलेरो तयार करता येईल का असा प्रश्न विचारतात. जगदीप त्याच्या बोलेरोत सीट अॅडजस्ट करून बसत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र त्याच्या उंचीमुळे गाडीत बसताना त्याला फारच कष्ट पडत असल्याचं दिसतं. त्याच्यासाठी आपण खास बदल करून एक स्पेशल जगदीप एडीशन तयार करू शकतो का असा प्रश्न एका अधिकाऱ्याला आनंद महिंद्रा यांनी विचारला आहे. गेल्या 20 वर्षांपासून जगदीप सिंग पंजाब पोलिसात काम करत आहेत. ते कोणत्याही सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीत. 190 किलो वजन असलेल्या जगदीप सिंग यांना 19 नंबरचा बूट लागतो. त्यांची उंची WWW रेसलर दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खलीपेक्षा 5 इंचांनी जास्त आहे. जेव्हा जगदीप घरातून बाहेर निघतात तेव्हा लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. उंचीमुळे ते लोकप्रिय असले तरी त्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगदीप सिंग यांनी म्हटलं की, मला सर्वात उंच पोलिस असल्याचा अभिमान आहे पण दररोज अनेक अडचणी येतात. बाजारात माझ्या आकाराचे कपडे, बूट मिळत नाही. सर्वसामान्य लोकांसाठी असलेल्या सोयी सुविधा मला उपयोगी पडतीलच असं नाही. झोपण्यासाठी किंवा बाथरूमला जाणं कठिण होतं. दरवाजे कमी उंचीचे असल्यानं त्यातून वाकून यावं लागतं. एखाद्या घरात जायचं म्हटलं तरी समस्या उभा राहते. जगदीप सिंग यांनी त्यांच्या लग्नाचाही किस्सा सांगितला. लग्नासाठी मुलगी शोधताना अनेक प्रश्न होते. त्यात इतकी उंची असल्यानं मुलींनी नाकारलं. कोण इतक्या उंच माणसाला मुलगी देणार. पण मला माझी लाइफ पार्टनर मिळाली. ती 5 फूट 11 इंच उंचीची आहे. हे वाचा : HONDA ची नवी धमाकेदार बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Anand mahindra, Truck- Bolero

    पुढील बातम्या