Home /News /viral /

काय ती स्टाईल, काय तो वेग! आनंद महिंद्रांनी शेअर केला डोसेवाल्याचा तुफान Video

काय ती स्टाईल, काय तो वेग! आनंद महिंद्रांनी शेअर केला डोसेवाल्याचा तुफान Video

एखाद्या रोबोच्या (Robot) वेगानं रस्त्यावर डोसे बनवणाऱ्या (Dosa) व्यक्तीचा एक व्हिडिओ (Video) प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.

    अरारारा... डोसे करताना काय ती स्टाइल, काय तो वेग! आनंद महिंद्रांनी शेअर केला तुफान Videoमुंबई, 18 ऑगस्ट : एखाद्या रोबोच्या (Robot) वेगानं रस्त्यावर डोसे बनवणाऱ्या (Dosa) व्यक्तीचा एक व्हिडिओ (Video) प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून वीजेच्या वेगानं डोसे तयार करणारा व्यापारी आणि त्याने भिरकावलेली प्लेट अलगद झेलून घेणारा त्याचा सहकारी यांचं कसब पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. रस्त्यावर मिळणाऱ्या विविध पदार्थांची चव तर आपल्या लक्षात राहतेच, मात्र हे पदार्थ विकणारे काही व्यापारी हे त्यांच्या हटके स्टाईलमुळंही लक्ष वेधून घेतात. त्यापैकीच आहे हा डोसेवाला. हातातील मोठ्या उलथण्याने डोसे कट करणारा, त्याचाच वापर करत त्याची घडी करणारा आणि घडी केलेल्या डोशाचे पुन्हा त्याच उलथण्याचा वापर करून तुकडे करणारा डोसेवाला डोळ्याची पापणी लवायच्या आत त्याचं काम पूर्ण करतो. डोसे करणारे तर अनेकजण असतात. पण या डोसेवाल्याची डोसे तयार करण्याची आणि ते कट  करण्याची पद्धत पाहून आपण थकून गेलो, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी दिली आहे. हे कसब पाहून आपण थकून गेलो आणि अर्थातच तोंडाला पाणीही सुटलं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटरवर अनेक नेटिझन्सनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. हे वाचा -आता मुलींनाही देता येणार NDA ची परीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय डोसे कापणाऱ्या व्यक्तीसोबतच त्याच्या प्लेट्स अलगद झेलणारा त्याचा सहकारीदेखील कौतुकास पात्र असून त्याच्यासाठीही आपण टाळ्या वाजवायला हव्यात, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे. 28 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Anand mahindra, Viral video on social media

    पुढील बातम्या