मुंबई, 22 ऑगस्ट : नागानं किंवा कोब्रा शिकार करताना अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत पण अॅनाकोंडा शिकार करताना पाहायला मिळणं अत्यंत दुर्मीळ आहे. या अॅनकोंडानं एका मगरीची शिकार केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ ब्राझिलमधला असल्याचं सांगितलं जात आहे. एका अॅनाकोंडाने मगरीला गिळण्याचा प्रयत्न केला. या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अॅनाकोंडा मगरी भोवती लपेटलेला आणि मगर मात्र आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Ê CAROÇO! 😳
Uma sucuri foi flagrada tentando engolir um jacaré na área de um condomínio na Ponta Negra. 🐍🐊 pic.twitter.com/d3JlCQm3Ey
ब्राझिलमधील स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार 7 ऑगस्ट रोजी ही घटना कॉन्डोमिनियम परिसरात घडली होती. पण हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेदरम्यान स्थानिक लोकांनी या अॅनाकोंडाच्या तावडीतून मगरीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी दोरीच्या मदतीनं अॅनलाकोंडाला खेचून बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र सापानं मगरीला घट्ट विळखा घातला होता.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या दोघांमध्ये झटापट झाली. लोकांनी अखेर दोरीच्या सहाय्यानं मगरीला सापाच्या तावडीतून सोडवलं आहे.हा व्हिडिओ 17 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी लाईक आणि रिट्वीटही केलं आहे.अॅनाकोंडा हा साप दक्षिण अमेरिकेत आढळतो. हा जगातील सर्वात मोठा साप आहे.