Hard Rock cafe मध्ये आजी-आजोबांनी लावलं वेड; बॉल डान्सचा VIDEO झाला व्हायरल

Hard Rock cafe मध्ये आजी-आजोबांनी लावलं वेड; बॉल डान्सचा VIDEO झाला व्हायरल

हे केस पांढरे झालेलं जोडपं कमालीच्या उत्साहात नृत्य करत आहे. इंटरनेटवर सगळीकडे या व्हीडिओचीच चर्चा आहे.

  • Share this:

कोलकाता 31 जानेवारी : इंटरनेटवर सतत वेगवेगळे डान्स व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. मात्र आता व्हायरल झालेला व्हिडिओ खूप खास आहे. यात एक कपल नृत्य करतं आहे. नव्वदच्या दशकातल्या सदाबहार गाण्यावर (classic song of 90's) केलेला डान्स कमालीचा आवडतो आहे.

कलकत्त्याच्या (Kolkata) एका कॅफेमध्ये (cafe) एका म्हाताऱ्या कपलनं 'वो चली वो चली...' या रोमँटिक गाण्यावर डान्स केला. जो कोणी हा डान्स पाहतोय तो वेडाच होतो आहे. असं नेमकं आहे तरी काय या व्हिडिओमध्ये? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाच थेट

हा व्हिडिओ @thebohobaalika या इस्टाग्राम युजरनं  शेअर केला आहे. या युजरच्या मते, 'हा व्हिडिओ कलकत्याच्या हार्ड रॉक कॅफेमधला (Hard Rock cafe) आहे. हा बँड नव्वदच्या दशकातली गाणी वाजवायचा. या गाण्यावर या वृद्ध कपलनं इतका सुंदर डान्स केला, की लोक त्यांच्यावर फिदा होत आहेत. आता नुकताच या व्हिडिओला 28 हजारहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ इंटरनेटवर अगदी जादू करतो आहे. अनेकांनी या व्हिडिओवर भरभरून कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या मुलीनं म्हटलं आहे, की हे नाचणारं जोडपं म्हणजे या बॅंडमधल्या मुख्य कलावंताचे आई-वडिल आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 31, 2021, 7:14 PM IST

ताज्या बातम्या