मराठी बातम्या /बातम्या /Viral /पुस्तकांच्या पानांचं त्यानं असं काही केलं, की पाहणारे झाले मंत्रमुग्ध! VIDEO पाहून घ्या आनंद

पुस्तकांच्या पानांचं त्यानं असं काही केलं, की पाहणारे झाले मंत्रमुग्ध! VIDEO पाहून घ्या आनंद

एका व्यक्तीनं पुस्तकांच्या पानांना (an artist makes 3d sculptures from pages of books) विविध आकार देऊन त्यातून उत्तमोत्तम कलाकृती साकारण्याचं तंत्र अवगत केलं आहे.

एका व्यक्तीनं पुस्तकांच्या पानांना (an artist makes 3d sculptures from pages of books) विविध आकार देऊन त्यातून उत्तमोत्तम कलाकृती साकारण्याचं तंत्र अवगत केलं आहे.

एका व्यक्तीनं पुस्तकांच्या पानांना (an artist makes 3d sculptures from pages of books) विविध आकार देऊन त्यातून उत्तमोत्तम कलाकृती साकारण्याचं तंत्र अवगत केलं आहे.

एका व्यक्तीनं पुस्तकांच्या पानांना (an artist makes 3d sculptures from pages of books) विविध आकार देऊन त्यातून उत्तमोत्तम कलाकृती साकारण्याचं तंत्र अवगत केलं आहे. जगात अनेक (Various artists with various skills) लोकांकडे अनेक प्रकारचे गुण असतात. सोशल मीडियावर आपापल्या गुणांचा साक्षात्कार करणारे व्हिडिओज अपलोड करून कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करत असतात. त्यातील काही कलाकृती (Miraculous arts) तर अद्भूत म्हणाव्यात, इतक्या उत्तम दर्जाच्या असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजणारी एका कलाकाराची कलाकृती किती सुंदर आहे, याची प्रचिती त्याचा व्हिडिओ देतो. या व्हिडिओत कलाकार पुस्तकाच्या पानांना विविध आकार देत त्यातून चेहरे, फुलं आणि अनेक कलाकृती साकार करत असल्याचं दिसतं. " isDesktop="true" id="633841" >

पुस्तकाच्या पानांचा उपयोग

हा जपानी कलाकार पुस्तकांच्या पानांना वेगवेगळे शेप देतो आणि त्यातून एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब चेहरा आकाराला येतो. पुस्तकांच्या पानांमधून 3D शेप तयार करणं, हे या कलाकाराचं खास वैशिष्ट्य. बरं, हे करण्यासाठी तो कुठलंही साधन वापरत नाही. साधी कात्रीदेखील तो यासाठी वापरत नाही. केवळ स्वतःच्या हातांचा वापर करत तो कागदांना वेगवेगळे आकार देतो आणि त्यातूनच भन्नाट कलाकृती घडत जातात.

चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद

अशा प्रकारच्या कलेतून साकार झालेल्या कलाकृतींना जगभरात मोठी मागणी असून ही कला संग्रही ठेवण्यासाठी अनेक हौशी मंडळी पैसे मोजायला तयार असल्याचं दिसतं. आपल्या कलेच्या माध्यमातून या कलाकारानं आतापर्यंत अनेकांना वेगवेगळ्या कलाकृती बनवून दिल्या आहेत.

हे वाचा- असं स्वागत कुणी करतं होय? हसून हसून दुखू लागलं पोट, पाहा VIDEO

व्हिडिओ होतोय व्हायरल

यूट्यूबवर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून युजर्सनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. आर्टिस्टनं कट करून हे तयार केलं असावं, असा संशय एकाने व्यक्त केला आहे, तर हे कसं करायचं याचं प्रात्यक्षिकही सादर करावं, अशी विनंती एका युजरनं केली आहे.

First published:
top videos

    Tags: Japan, Video viral, Youtube