मुंबई, 29 मार्च : रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस भयानक अपघाताच्या घटना कानी पडत असतात. अशा घटनांमध्ये अनेकदा चुकी नसलेल्यांनाही आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. आत्तापर्यंत अपघातांचे अनेक धक्कादायक व्हिडीओही समोर आलेत. अशातच यामध्ये एका व्हिडीओची भर पडली असून अपघाताचा आणखी एक भयानक व्हिडीओ समोर आलाय.
अपघाताचा समोर आलेला व्हिडीओ, अमेरिकेतील शहराचा असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, हायवेवर अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. दरम्यान, एका ट्रकचे चाक सुटून थेट डाव्या बाजूने जाणाऱ्या कारला धडकते. टायरला धडकताच कार हवेत कित्येक फूट उंच उडताना दिसते. एखाद्या अॅक्शन चित्रपटातील दृश्याप्रमाणे रस्त्यावर पडते. हा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत आहे.
Witnessed and recorded the most INSANE car crash yesterday, you can see Autopilot also swerve and avoid the rouge tire for me $TSLA pic.twitter.com/csMh2nbRNX
— Anoop (@Anoop_Khatra) March 25, 2023
@Anoop_Khatra नावाच्या ट्विटर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. 29 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही एखाद्या चित्रपटाच्या सीनसारखं वाटेल. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्युज आले आहेत.
दरम्यान, त्यामुळे आपल्याला कायमच सांगितलं जातं रस्त्यावरुन चालताना किंवा गाडीवरुन जाताना कायम सावधानता बाळगण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे अनेक अपघात घडू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Top trending, Viral, Viral videos