मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Women's Day 2021: ‘मला रोज महिला दिन साजरा करायचाय’; अमृता फडणवीस यांचा नवा VIDEO व्हायरल

Women's Day 2021: ‘मला रोज महिला दिन साजरा करायचाय’; अमृता फडणवीस यांचा नवा VIDEO व्हायरल

स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. आज ८ मार्च आजचा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 मार्च: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच चर्चेत असतात. कधी त्या आपल्या लूकमुळे लोकांचं लक्ष वेधून घेतात तर कधी आपल्या गाण्यातून सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावेळी त्यांनी जगभरातील स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. आज ८ मार्च आजचा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि यावर्षीदेखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत. स्त्रियांवर होणारे बलात्कार, घाण प्रकारे होणारी ट्रोलिंग, स्त्रियांच्या होत असलेल्या आत्महत्त्या हे प्रचंड वाढलं आहे. पण स्त्रियांच्याबाबतीत तुम्ही जे बोलता, त्यांच्याशी कसं वागता याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता पुरोगामी महाराष्ट्रात काही बदल घडवून आणायचा असेल, तर तो तुम्हीच घडवून आणू शकता. स्त्रीला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर तुम्ही तिची साथ द्या, त्यांना मागे ओढू नका. तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा” असं आवाहन अमृता फडणवीस यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा - ‘कुणी म्हणालं वेडी कुणी म्हणालं खुळी’; अमृता फडणवीस घेऊन येतायेत नवं गाणं

जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो?

जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. (International Women’s Day) असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचं रक्षण व त्यांना समानतेचा दर्जा मिळावा म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या जागतिक दिनाचं निमित्त साधून अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन येत आहेत.

First published:

Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis, International women's day, Women, Womens day