अमेरिकन रॅपरने स्वतः जिंकलेल्या ग्रॅमी अवॉर्डवर केलं 'मूत्रविसर्जन' आणि शेअर केला VIDEO

अमेरिकन रॅपरने स्वतः जिंकलेल्या ग्रॅमी अवॉर्डवर केलं 'मूत्रविसर्जन' आणि शेअर केला VIDEO

कान्येचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जिंकलेली ग्रॅमी पुरस्काराची ट्रॉफी कमोडवर पडलेली दिसून येत आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 18 सप्टेंबर : अमेरिकन टीव्ही स्टार किम करदाशियन (Kim Kardashian) विविध कारणांसाठी चर्चेत असते. त्याचबरोबर आता तिचा पती कान्ये वेस्ट (Kanye West) हा देखील एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. सध्या कान्येचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जिंकलेली ग्रॅमी पुरस्काराची ट्रॉफी कमोडवर पडलेली दिसून येत आहे. त्यावर कुणीतरी लघुशंका करताना दिसून येत आहे.

कान्ये वेस्टच्या ऑफिशिअल twitter अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून यामध्ये लघूशंका करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा खुलासा झालेला नाही. ती व्यक्ती कान्ये वेस्ट आहे की दुसरा कुणी हे मात्र समजू शकलेलं नाही आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं आहे कि, विश्वास ठेवा, मी आता थांबणार नाही. याआधी कान्ये वेस्ट याने आपल्या काँट्रॅक्ट्चे फोटो टाकत आपल्याला गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असल्याचे म्हटलं होतं. सध्या कान्ये वेस्ट आणि एका संगीत कंपनीमध्ये गाण्यांच्या अधिकारांवरून वाद सुरु असून यादरम्यान आलेल्या या व्हिडीओमुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा-कुत्रा-मांजर नाही तर थेट बैलालाच बाईकवर डबलसीट नेलं; विश्वास बसत नाही पाहा VIDEO

वाचा-पुलावरून थेट बाईकसह नदीत बुडालं कुटुंब, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO

हा व्हिडीओ पोस्ट करत कान्ये वेस्ट याने लिहिलं आहे, विश्वास ठेवा मी आता थांबणार नाही. संगीतकारांना काहीही बोलण्यास अधिकार नाहीत. मात्र मी आता थांबणार नसून मला जे सांगायचं आहे ते मी सांगणार आहे. माझी समस्या ही आहे की, त्यांनी मला साइन करून माझ्यासॊबत काम न करता ते बियोन्से बरोबर काम करत आहेत.

वाचा-...आणि थेट गाडीसमोर आलं 'भूत', पर्यटकांची काय झाली अवस्था पाहा VIDEO

दरम्यान, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात यावर प्रतिकिया उमटत असून त्याने आपल्या कृतीबद्दल माफी मागण्याची देखील मागणी करण्यात येत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2020, 6:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या