Home /News /viral /

चार बायका अन् फजिती ऐका! माध्यम सम्राट 91 व्या वर्षी घेणार चौथा घटस्फोट, अशी आहे रंगील कहाणी

चार बायका अन् फजिती ऐका! माध्यम सम्राट 91 व्या वर्षी घेणार चौथा घटस्फोट, अशी आहे रंगील कहाणी

Rupert Murdoch Divorce: मीडिया मुगल आणि अमेरिकन अब्जाधीश रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा घटस्फोट घेणार आहेत. त्यांचा हा चौथा घटस्फोट आहे. त्याने 2016 मध्ये जेरी हॉलसोबत चौथे लग्न केले.

    न्यूयॉर्क, 24 जून : अमेरिकेच्या माध्यम क्षेत्रातील नामांकित (American Media Mogul) व्यक्तिमत्त्व असलेले रूपर्ट मरडॉक (Rupert Murdoch) सध्या 91 वर्षांचे आहेत. मोठे बिझनेसमन असणारे मरडॉक अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मरडॉक स्वतःच माध्यम क्षेत्रात आहेत, त्यातही इतर अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत असतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांची अनेक लग्न. आता मात्र लग्नामुळे नाही, तर घटस्फोटामुळे त्यांची चर्चा होते आहे. रूपर्ट मरडॉक यांनी आतापर्यंत चार लग्न केली आहेत. त्यातलं शेवटचं म्हणजे चौथं लग्न त्यांनी 65 वर्षांची अभिनेत्री जेरी हॉल (Jerry Hall) हिच्याशी केलं होतं. आता मात्र त्यांचा घटस्फोट (Divorce) होतो आहे. झी न्यूज हिंदीनं त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. मीडिया टायकून आणि अब्जावधींची (Billionaire) संपत्ती असणारे रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा घटस्फोट घेणार आहेत. अभिनेत्री जेरी हॉलशी त्यांनी लंडनमध्ये झालेल्या एका समारंभात 2016 मध्ये लग्न केलं होतं. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मरडॉक यांनी सुपरमॉडेल हॉलपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते दोघंही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करतील. मरडॉक यांचं हे चौथं लग्न आहे. पॅट्रिशिया बुकर हिच्याशी त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं होतं. 1956 ते 1967 अशी 11 वर्षं त्यांचं पहिलं लग्न टिकलं. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अ‍ॅना मारिया टोव हिच्याशी दुसरं लग्न केलं. 1967 ते 1999 पर्यंत दुसऱ्या पत्नीसोबत त्यांचा संसार सुरु होता. मात्र नंतर तिलाही घटस्फोट दिला. 1999 मध्ये वेंडी डेंग हिच्याशी त्यांनी तिसरं लग्न केलं. 14 वर्षांनी या दोघांचाही शेवटी घटस्फोट झाला. 2014 मध्ये हा घटस्फोट झाल्यानंतर जेरी हॉल हिच्याशी 2016 मध्ये मरडॉक यांनी लग्न केलं. आता याही लग्नाचा शेवट घटस्फोटात होतो आहे. Shocking! Honeymoon वर असताना नवऱ्याकडून झाली एक चूक; बायकोचा जागीच मृत्यू रिपोर्टनुसार, या घटस्फोटामुळे मरडॉक यांच्या बिझनेसवर काहीही परिणाम होणार नाही असा अंदाज आहे. मरडॉक यांचे समभाग असणारी फॉक्स कॉर्पोरेशन ही कंपनी फॉक्स न्यूज चॅनेल (Fox News Channel) आणि वॉल स्ट्रील जर्नल (Wall street Journal) या कंपन्यांची पेरेंट कंपनी आहे. मरडॉक त्यांच्या नेवाडा येथील कौटुंबिक ट्रस्टच्या माध्यमातून फॉक्स कॉर्प आणि न्यूज कॉर्प या दोन कंपन्यांची जबाबदारी सांभाळली जाते. या ट्रस्टची या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 40 टक्के भागीदारी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, मरडॉक यांची एकूण संपत्ती 17.7 बिलियन डॉलर इतकी आहे. त्यांनी जगभरात माध्यम कंपन्यांचं मोठं जाळं विणलं आहे. बिझनेसच्या क्षेत्रात त्यांची चर्चा एरव्ही होतच असते; पण आता त्यांच्या चौथ्या घटस्फोटाची चर्चाही बरीच होते आहे. त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असणाऱ्या चौथ्या पत्नीला ते आता घटस्फोट देणार आहेत.
    First published:

    Tags: Love, Love story

    पुढील बातम्या