अरेरे! FREE दारू मिळवण्यासाठी कपलने बारमध्येच केले अश्लील प्रकार आणि...

अरेरे! FREE दारू मिळवण्यासाठी कपलने बारमध्येच केले अश्लील प्रकार आणि...

फुकट दारू मिळवण्यासाठी कोणत्या स्थरावर जाऊ शकतात याचा काही नेम नाही.

  • Share this:

अटलांटा, 11 फेब्रुवारी : फुकट ते पौष्टिक अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र फुकट मिळवण्यासाठी कोणत्या स्थरावर एखादी व्यक्ती जाऊ शकतो, याला काही मर्यादा नाही. असाच एक प्रकार अमेरिकेतील अटलांटा येथे घडला. एका अमेरिकन जोडप्याने बारमध्ये अनोळखी व्यक्तींकडून विनामूल्य पेय मिळवण्यासाठी एकमेकांशी लग्न करणार असल्याचे सांगितले, त्यानंतर एकमेकांनी बारमध्येच किस करण्यात आणि अश्लील प्रकार करण्यास सुरुवात केली.

अलाबामाच्या प्रॅटव्हिले येथील रहिवासी असलेली जोडपी कोरीन मिलर आणि अ‍ॅडम कॅरोल हे दोघेही गेल्या वर्षी जुलैमध्ये अटलांटा येथे कोरीनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. सुट्टीच्या काळात त्याला जास्त पैसे खर्च करायचे नव्हते म्हणून त्याने एक योजना आखली. बारमध्ये विनामूल्य पेय मिळविण्यासाठी, त्याने आपल्या गर्लफ्रेंण्डला प्रपोज करण्याचा खोटा प्लॅन तयार केला. सर्वांसमोर प्रपोज केल्यामुळं बारच्या मालकाने त्यांना फुकट दारू दिली.

वाचा-लंडनमध्ये गांगुलीने घेतलं घर, BCCI अध्यक्षांचे इंग्लंड दौऱ्यातले फोटो VIRAL

वाचा-महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण

मिलरने यूके डेलीला (UK Daily) दिलेल्या माहितीत, लोकांनी त्यांना साखरपुडा केल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या, त्याचबरोबर हॉटेलमध्ये फुकट खायला दिले. असा प्रकार त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांनी बऱ्याचवेळा ही कल्पना वापरून पाहिली आहे. त्यामुळं आता फुकट दारू मिळवण्यासाठी आता लोक चक्क खोट लग्न करत असल्याचा आव आणत आहेत.

हाच प्लॅन मिलरने दुसऱ्या एका बारमध्येही वापरला. दरम्यान एका ठिकाणी त्यांचा हा प्लॅन बार मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांचे भांडे फुटले. त्यानंतर खरच मिलर आणि कॅरोल यांना साखरपुडा करावा लागला. येत्या 2-3 महिन्यांत त्यांचा विवाह होणार आहे.

वाचा-VIRAL VIDEO : 3 वर्षाच्या चिमुरडीने Cute आवाजात गायलं ‘दिल है छोटा सा’

वाचा-Kiss नव्हे हा तर ‘कोरोना’चा डंक, Kiss Day ला राहा सावध !

First published: February 12, 2020, 10:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या