मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कामावरून निघाला आणि पालटलं नशीब; घरी पोहोचेपर्यंत करोडपती झाली व्यक्ती

कामावरून निघाला आणि पालटलं नशीब; घरी पोहोचेपर्यंत करोडपती झाली व्यक्ती

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एक व्यक्ती कामावरून घरी जायला निघाला. रस्त्यात त्याने एक छोटासा थांबा घेतला आणि घरी पोहोचेपर्यंत तो करोडपती झाला.

    वॉशिंग्टन, 06 मे :  मजेमजेत किंवा टाइमपास म्हणून कोण कधी काय करेल सांगू शकत नाही. पण हीच मजा किंवा टाइमपासही नशीब पालटू शकतं. याचाच प्रत्यय आला होत अमेरिकेतील एका दाम्पत्याला. एक व्यक्ती कामावरून घरी जायला निघाला. रस्त्यात त्याने एक छोटासा थांबा घेतला आणि घरी पोहोचेपर्यंत तो करोडपती झाला. त्याच्या एका पावलामुळे त्याचं नशीब पालटलं. अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनामध्ये राहणारी ही व्यक्ती. कामावरून घरी परतताना मजा म्हणून एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. पण यामुळे त्याचं नशीब फळफळणार आहे, याचा त्याला अंदाचाही नव्हता. त्याला त्या लॉटरीचा जॅकपॉट लागला होता. तब्बल 2 कोटी 28 लाख रुपये तो जिंकला होता. लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला जॅकपॉट लागल्याचं सांगितलं तेव्हा सुरुवातीला त्यालाही विश्वास बसत नव्हता. घरी जाऊन त्याने बायकोलाही सरप्राइझ दिलं.  या व्यक्तीने सांगितलं की त्याने बायकोला जेव्हा जॅकपॉटबाबत सांगितलं तेव्हा तिला इतका आनंद झाला की ती मोठ्याने किंचाळू लागली. हे वाचा - Swiggy वरून ऑर्डर केली Coffee पण...; Delivery Boy चा प्रताप पाहून ग्राहक शॉक स्टार टेलिग्रामच्या रिपोर्टनुसार साऊथ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या मते, साइकेडेलिक पेआऊट गेमची ही लॉटरी जिंकण्याची शक्यता 10 लाखात कुणा एकाचीच असते. ही लॉटरी विकणाऱ्या सनोकोला यासाठी 2 लाख 28 हजारांचा बोनसही मिळाला आहे अशी माहिती लॉटरी अधिकाऱ्यांनी दिली आहे. कपलने जिंकलेल्या जॅकपॉटची काही रक्कम चर्चसाठी दान करण्याचा आणि काही सेव्हिंग कऱण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा - क्या बात है! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते Salary अशी चालता चालता लॉटरी लागण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही कुम्ब्रियाच्या कार्लिस्लेत एका कारखान्यात नोकरी करणाऱ्या वृद्धालाही अशीच लॉटरी लागली होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 61 वर्षीय इयान ब्लॅकने कामावरून परतताना एक पेपर खरेदी केला. याचदरम्यान त्यांची नजर नॅशनल लॉटरीवर पडली आणि त्यांनी एक स्क्रॅच कार्ड खरेदी केलं. इयानने घरी जाऊन आपली पत्नी सँड्राला हे तिकिट क्रॉसचेक करायला सांगितलं. त्यांना 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रूपयांची लॉटरी लागली होती.  करोडपती बनताच या व्यक्तीने आपल्या मालकाला फोन करून सांगितलं की आता तो कधीच कामावर परत येणार नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Lottery, Viral

    पुढील बातम्या