LIVE सामन्यावेळी दोघींनी काढले टीशर्ट, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

सामना सुरु असतानाच कॅमेरा त्या दोघींच्या समोर येताच टी शर्ट काढल्यानं एकच गोंधळ उडाला.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 04:41 PM IST

LIVE सामन्यावेळी दोघींनी काढले टीशर्ट, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

वॉशिंग्टन, 03 नोव्हेंबर : क्रीडा जगतात अनेक खेळांमध्ये लाइव्ह सामना सुरु असताना प्रेक्षकांची घुसखोरी, खेळाडूंकडे पाहून शेरेबाजी, चित्रविचित्र हावभाव करणं या गोष्टी होतच असतात. काहीवेळा मैदानात प्रेक्षक नग्न धावल्याचे प्रकारही घडले आहेत. आता अमेरिकेत बेसबॉल वर्ल्ड सिरीजवेळी दोन मॉडेल्सनी टीशर्ट काढल्याने खळबळ उडाली.

अमेरिकेत ह्यूसन अॅस्ट्रोज आणि वॉशिंग्टन नॅशनल्स यांच्यात सामना सुरु होता. त्यावेळी कॅमेरा त्या दोन मॉडेल्ससमोर आला. हे समजताच दोघींनीही टीशर्ट काढला. त्यांच्या या प्रकाराने प्रेक्षक अवाक् झाले. मॉडेल्सच्या या कृत्याने खेळाडुसुद्धा हैराण झाले. जास्त गोंधळ झाला म्हणून खेळाडूंनी त्या दिशेने पाहिलं तेव्हा समोर जे दिसलं ते पाहताच त्यांनी माना फिरवल्या.

मॉडेल्सनी टीशर्ट काढल्यानंतर त्यावेळी काही लोकांनी फोटोही काढले. त्यावेळी गोंधळ निर्माण झाल्याने मैदानावरली गार्ड त्यांच्याजवळ पोहचले. त्या दोघींना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं. द सनने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही मॉडेल्सना याबद्दल आजीवन बंदी घालण्यात आली आहे. यात जूलिया रोजने म्हटलं की इथं बंदी घातली तरी आम्ही दुसऱ्या स्टेडियममध्ये जाऊन असंच करू.

सामना सुरु असताना अशा प्रकारे टी शर्ट काढण्याचं काऱण काय ? असं विचारताच ज्यूलिया रोजने सांगितलं की हे सर्व स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी केलं.

Loading...

अमेरिकेत बेसबॉल पाहण्यासाठी जास्त लोक येतात. मी फुटबॉल चाहती आहे पण फुटबॉलच्या सामन्यात कॅमेरा तुमच्यावर येणं अशक्य असंत असंही तिने सांगितलं. ज्युलियाने टी शर्ट उतरवल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे.

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

VIDEO : ब्रेन सर्जरीचं केलं फेसबुक लाइव्ह, पेशंट डॉक्टरांशी मारतेय गप्पा

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा Viral Video

VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...