बराक ओबामा झाले वाढपी, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

बराक ओबामा झाले वाढपी, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा जेवण वाढत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 16 नोव्हेंबर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ओबामा जेवण वाढताना दिसत आहेत. यामध्ये ते एकटेच नाही तर पत्नी मिशेल ओबामा सुद्धा आहेत. ओबामा अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष होते. सध्या ते वॉशिंग्टनमध्ये राहतात. आपल्या साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओबामांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ ते राष्ट्राध्यक्ष असतानाचा आहे.

जगातील बलाढ्य राष्ट्र असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवलेल्या बराक ओबामा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते नक्की काय करत आहेत याची चर्चा रंगली होती. बराक ओबामा जेवण का वाढत आहेत. व्हिडिओ कधीचा आहे याविषयी चर्चा सुरू झाली होती.

बराक ओबामा यांचा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आला आहे की, अनेक वर्षे देशाची सेवा केलेल्यांचे आभार मानत असताना ओबामा आणि त्यांचे कुटुंब.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2016 मधील आहे. त्यावेळी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तेव्हा आर्मीच्या रिटायरमेंट होममध्ये माजी सैनिकांचे आभार मानण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी माजी सैनिकांना स्वत: जेवण वाढलं होतं.

जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 09:18 AM IST

ताज्या बातम्या