अरे देवा! एका अवलियानं विकलं 85 लाखांचं एक केळं, वाचा काय आहे प्रकरण

अरे देवा! एका अवलियानं विकलं 85 लाखांचं एक केळं, वाचा काय आहे प्रकरण

भिंतीवर चिटकवलेल्या या 85 लाखांच्या केळ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मियामी, 07 डिसेंबर : केळ खाणं हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. सध्या बाजारात एका केळ्याची किंमत फार तर फार 10 रुपये असू शकते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे असलेल्या एका केळ्याची किंमत 85 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल? हे कदाचित विचित्र वाटेल पण ते खरे आहे. सध्या सोशल मीडियावर या 85 लाखांच्या केळ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा नक्की काय आहे या केळ्याचे प्रकरण...

सध्या सोशल मीडियावर भिंतीवर टेपनं चिटकवलेल्या केळ्याचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र हे खरे केळे नसून ही एक कलाकृती आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मियामी समुद्रानजीक असलेल्या बेसेलने या संग्रहालयानं ही कलाकृती 85.81 लाख रुपयांना विकली. हे प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरीझिओ कॅटलन यांनी बनवलेली ही कलाकृती आहे. मॉरीझिओने यापूर्वी देखील तीन कलाकृती तयार केल्या आहेत, त्यापैकी दोन विकल्या गेल्या आहेत.

वाचा-कधी मांजरीला बोलताना पाहिलंय? पाहा हा धम्माल VIRAL VIDEO

पॅरिसियन आर्ट गॅलरीचे मालक इमॅन्युले पॅरोटीनं यांनी, “केळं हे जागतिक व्यापार आणि विनोदबुद्धीचे प्रतीक आहे. म्हणून या कलाकृतीला 'कॉमेडियन' असे नाव देण्यात आले आहे. पॅरोटीनने फेसबुकवर लिहिले आहे की, 'या केळाच्या तुकड्यांची किंमत ही त्या वस्तुला दिलेले महत्त्व ठरवते”. तसेच, पॅरोटीन यांनी, “कॅटेलन आपल्या हॉटेलच्या खोलीत एक शिल्प बनवण्याचा विचार करीत होता, जे त्याला नेहमी प्रेरणा देईल. त्यांनी प्रथम तांब्याच्या पेंटसह पेंट केलेले तांबे आणि केळी तयार केली. यानंतर, खऱ्या केळीसारखा त्याला टेप लावून चिटकवले”, असे सांगितले.

वाचा-आता पाण्याची भीतीच वाटणार नाही, पुण्याच्या अवलियाने शोधला नवा फंडा!

 

View this post on Instagram

 

The talk of the town in Miami right now is Maurizio Cattelan’s “Comedian,” a banana 🍌 duct taped to the wall. Two have already sold for $120,000 at Perrotin 😉 read more, including about the banana my husband, @nnddmmyy, hung on his dorm wall for two years, on Artnet News, link in bio @artnet @galerieperrotin @mauriziocattelan @artbasel #art #conceptualart #banana #sculpture #artbasel #artbaselmiamibeach #artbaselmiami #artfair #artgallery #artwork #whatisart #isthisart #miami #miamibeach #florida #miamiflorida #mauriziocattelan #perrotin #galerieperrotin #artist #bananapeel #ducttape #artnetnews #artcollector #vippreview #artjournalism #artjournalist #openingday #artgallery #gallery #artworld

A post shared by Sarah Cascone (@sarahecascone) on

वाचा-Airtel ने घेतला मोठा निर्णय, कॉलिंग महागल्याचं ग्राहकांचं म्हणणं कंपनीने ऐकलं

दरम्यान, आर्टवर्कमध्ये वापरलेली केळी मियामीच्या किराणा दुकानातून खरेदी केली गेली असे म्हणतात. त्यामध्ये नलिका टेपचा एक तुकडा लावला गेला आहे. या कलाकृतीसह ग्राहकांना विश्वासार्हतेचे प्रमाणपत्र देखील दिले जातेआहे. मात्र, हे केळं किती दिवसात खराब होणार हे सांगण्यात आलेले नाही. मुख्य म्हणजे मॉरीझिओ कॅटेलन हाच कलाकार आहे, जो काही दिवसांपूर्वी आपल्या सोन्याच्या शौचालयामुळे चर्चेत आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या