VIDEO : हरणांचा पाहुणचार करणं महिलेला पडलं महागात, भरावा लागला 39 हजारांचा दंड

रस्त्यावरून जात असलेल्या हरणांच्या काळपातील हरणांना घरी बोलवून खायला घालणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

रस्त्यावरून जात असलेल्या हरणांच्या काळपातील हरणांना घरी बोलवून खायला घालणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

  • Share this:
    कोलोरॅडो, 16 फेब्रुवारी : रस्त्यावरून जात असलेल्या हरणांच्या काळपातील हरणांना घरी बोलवून खायला घालणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. प्राण्यासोबत वेळ घालवण्याची हौस महागात पडली आहे. बेकायदेशीरपणे तीन हरणांना घरात बोलवून खायला घातल्या प्रकरणी एका महिलेला तब्बल 39 हजार 200 रुपयांचा दंड भरावा लागला आहे. ही महिला हरणांना खायला घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर तिथल्या पार्क आणि वन्यजीव अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाताच कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. जंगलातील प्राण्यांना अशा पद्धतीची दिलेली वागणूक ही प्राणी आणि माणसांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अशा पद्धतीनं प्राण्यांना घरी बोलवून खायला देणं बेकायदेशीर असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हेही वाचा-VIDEO : भयंकर वादाळामुळे रन वेवर उतरलेलं विमान पुन्हा हवेत उडालं सिंहाची शिकार हरीण आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हरणांनी जर माणसांच्या घरात प्रवेश करण्यास सुरुवात केली तर पर्यायानं सिंहही शिकारीसाठी जंगलातून मानवी वस्तीत येतील. त्यामुळे हे टाळण्यासाठी मानवी वस्तीत अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात. मला प्राण्यांना खायला द्यायला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं असं या महिलेचं म्हणणं होतं. मात्र अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे खायल्या दिल्यानं या महिलेला 39 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. हेही वाचा-VIDEO: धावत्या रेल्वेच्या दारात बनवत होता TikTok, हात सुटला अन्... हेही वाचा-कोल्हापुरी माणसाचा गुंडांना हिसका,तरुणाच्या हातातून हिसकावली काठी आणि...VIDEO
    First published: